वाशीमध्ये कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:26 AM2017-10-06T02:26:48+5:302017-10-06T02:27:25+5:30

व्यवसाय, नोकरी, सामाजिक क्षेत्र, राजकारण, क्रीडा, कला अशा सर्वच क्षेत्रात आज स्त्री कर्तृत्व दिसून येते.

Wishing the talented women in Vashi, Gaurav will be honored | वाशीमध्ये कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

वाशीमध्ये कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

Next

नवी मुंबई : व्यवसाय, नोकरी, सामाजिक क्षेत्र, राजकारण, क्रीडा, कला अशा सर्वच क्षेत्रात आज स्त्री कर्तृत्व दिसून येते. या स्त्री कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सलाम स्त्री कर्तृत्वाला’ या पुरस्कार सोहळ््याचे आयोजन केले आहे. शनिवार, ७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता शिव विष्णू हॉल, वाशी येथे हा कार्यक्र म होणार आहे.
कर्तृत्ववान महिलांचा सत्कार या कार्यक्र मात केला जाणार आहे. महिलांसाठी खास असलेल्या या कार्यक्र मात धमाल गेम्स आयोजित केले आहेत. या खेळाच्या माध्यमातून जिंकणाºया प्रत्येक महिलेला आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी दिली जाणार आहे. अनघा देव यांच्या ‘गोडवा संस्कृतीचा’ या ग्रुपतर्फे भोंडला खेळला जाणार आहे. पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भोंडल्यात, भोंडल्याची गाणी, खेळ आणि विशेष म्हणजे, खिरापती ओळखल्या जाणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे करणार आहेत. स्त्री कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, भोंडल्याचा आनंद घेण्यासाठी तसेच खेळातून भरघोस बक्षिसे जिंकण्यासाठी सखींनी या कार्यक्रमाचा नक्कीच लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने केले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना निवेदिका उत्तरा मोनेंच्या सहकार्याने मिती क्रिएशन्सच्या माध्यमातून आखली आहे. विविध क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणाºया महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या कर्तृत्वातून इतर महिलांना प्रेरणा मिळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असून, महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोगाच्या वतीने केले आहे.

Web Title: Wishing the talented women in Vashi, Gaurav will be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.