शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

दोन तासांत सभा उरकली; तब्बल १२३ कोटींचे प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 11:38 PM

११६ पैकी शेवटपर्यंत ३४ नगरसेवकच उपस्थित

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. यामुळे महानगरपालिकेमध्ये विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याची घाई सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल १२३ कोटी रुपयांचे ५४ प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर करण्यात आले. ११६ नगरसेवकांपैकी शेवटपर्यंत फक्त ३४ नगरसेवकच उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या दरम्यान सर्वसाधारण सभेचे आयोजन करत असते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे सप्टेंबर महिन्याची सभा १३ सप्टेंबरलाच आयोजित करण्यात आली. सकाळी ११ वाजता सभा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित न झाल्यामुळे दोन तास उशिरा सभेचे कामकाज सुरू झाले. साडेबारा वाजता फक्त १४ नगरसेवक उपस्थित होते. एक वाजता ११६ नगरसेवकांपैकी फक्त ६० नगरसेवक उपस्थित होते. विषय पत्रिकेवर प्रशासनाने पाठविलेले ९ विषय होते. आयत्या वेळी ४५ प्रस्ताव मांडण्यात आले. रोडचे काँक्रीटीकरण, पदपथ निर्मिती, उद्यानांची सुधारणा व इतर अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात मांडण्यात आले. एकाही विषयावर चर्चा करण्यात आली नाही. सभागृह नेत्यांनी प्रस्ताव मांडले की तत्काळ मंजूर झाल्याची घोषणा करून दुसरा प्रस्ताव मंजुरीसाठी घेतला जात होता. एका प्रस्तावावर शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी बोलण्यासाठी हात वर केला, परंतु त्यांना बोलू न देता विषय मंजूर करण्यात आला. शेवटचे दोन प्रस्ताव मांडण्याची घोषणा करण्यात आली, परंतु त्या प्रस्तावांची विषयपत्रिकाही कोणाकडेच नव्हती. मात्र ती सर्वांना देण्यापूर्वीच विषय मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली.

सर्वसाधारण सभा पावणेएक वाजता सुरू झाली व तीन वाजता दोन तासांमध्ये सर्व कामकाज संपविण्यात आले. यामधील अर्धा तास श्रद्धांजली वाहण्यासाठी व अर्धा तास प्रश्नोत्तराच्या तासाला देण्यात आला होता. ८ नगरसेवकांनी सभागृहात लेखी प्रश्न उपस्थित केले होते, परंतु फक्त दोनच नगरसेवकांना त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करता आली. प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे कारण देवून इतरांना बोलू दिले नाही.नगरसेवकांनी मागणी करूनही वेळ वाढवून दिला नाही. प्रश्नोत्तरानंतर पुढील एक तासामध्ये तब्बल १२३ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले. सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांना विषयांचे गांभीर्य नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणुका होणार असल्यामुळे ही घाई करण्यात आली आहे. चर्चा झाली नसल्यामुळे प्रस्तावांमधील त्रुटींना जबाबदार कोण असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.नगरसेवकांची उदासीनता; नागरिकांकडूनही नाराजी व्यक्तसर्वसाधारण सभेला अनेक नगरसेवकांनी दांडी मारली. सकाळी ११ वाजता सभेची वेळ होती, परंतु तेव्हा एकही नगरसेवक सभागृहात नव्हता. साडेबारा वाजता फक्त १४ नगरसेवक उपस्थित होते. पावणेएक वाजता ४५ व एक वाजता ६० नगरसेवक होते. पावणेतीन वाजता सभागृहात ३१ जणच उपस्थित होते. महापालिकेमध्ये १११ लोकनियुक्ती व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. सभा संपली तेव्हा फक्त ३४ जणच उपस्थित होते. यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली.दोन कार्यकारी अभियंत्यांना नोटीसशहर अभियंत्यांनी महापालिका कार्यक्षेत्रामधील खड्डे दुरुस्तीच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून कार्यकारी अभियंता संजय देसाई व अनिल नेरपगार यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे सभागृहात सांगितले.दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समाधानकारक उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाईही केली जाईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.शिवसेना नगरसेवकाचा सभात्यागसानपाडा येथील शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांना त्यांच्या प्रभागामधील विषयावर चर्चा करू दिली नाही. त्यांनी हात वर केला असतानाही प्रस्ताव घाईमध्ये मंजूर करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या वास्कर यांनी विषयपत्रिका फेकून निषेध व्यक्त केला. त्यांनी व कोमल वास्कर यांनी या मनमानीचा निषेध करून सभात्याग केला.नाल्यांच्या दुरवस्थेचे सभागृहात उमटले पडसादसीबीडीमधील नाल्याच्या दुरुस्तीच्या एकमेव प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली. रामदास पवळे, अशोक गुरखे, शुभांगी पाटील, शंकर मोरे, शशिकला पाटील, लता मढवी, सुरेखा नरबागे, कविता आंगोडे, रामचंद्र घरत, देविदास हांडे पाटील, प्रशांत पाटील, मुनावर पटेल, रवींद्र इथापे यांनी शहरातील नाले, भुयारी मार्ग व पादचारी पुलांच्या दुरवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली. मागणी करूनही नाल्यांची कामे केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. महापौर जयवंत सुतार यांनीही सदस्यांनी मांडलेल्या भावना लक्षात घेवून नाले, पादचारी पूल व भुयारी मार्गांची कामे लवकर करण्याचे आदेश दिले.सभागृहात कोरमही अपूर्णमहापालिकेची सभा सुरू करण्यासाठी साधारणत: ३७ नगरसेवक सभागृहात असणे आवश्यक आहे. कोरम पूर्ण होत नसल्याने सभा दोन तास उशिरा सुरू झाली. सभेच्या शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये कोरम पूर्ण होईल एवढेही संख्याबळ नव्हते. परंतु विरोधकांनीही आक्षेप घेतला नसल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका