नवी मुंबई : दोन वर्षांत लाच मागणाऱ्या २५ जणांवर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली असून या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांसह एपीएमसी, पोलीस व इतर शासकीय कर्मचाºयांचा समावेश आहे.
एखाद्या कामाच्या मोबदल्यात लाच घेणे अथवा देणे कायद्याने गुन्हा असून त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जाते. यानंतरही अनेकदा शासकीय कर्मचाºयांकडून सर्वसामान्यांची अडवणूक करून लाचेची मागणी केली जाते. याबाबत नागरिकांमध्ये तसेच शासकीय कर्मचाºयांमध्ये जनजागृतीसाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून जनजागृती केली जाते. त्यानुसार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून २८ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर हा जनजागृती सप्ताह साजरा केला जात असल्याची माहिती नवी मुंबई एसीबीचे उप अधीक्षक रमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकूण १३ कारवाई २०१८ मधील असून, त्यामध्ये १५ जणांना अटक झालेली आहे. तर चालू वर्षात दहा महिन्यांत आठ कारवार्इंमध्ये दहा जणांना अटक झालेली आहे. या कारवार्इंमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयासह, एपीएमसीचे अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच इतर शासकीय अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात संबंधितांकडून तक्रार प्राप्त होताच सापळा रचून या कारवाई करण्यात आल्या आहेत.