मदतीशिवाय आपत्तीग्रस्तांचे जगणे कठीण
By admin | Published: May 10, 2017 12:25 AM2017-05-10T00:25:54+5:302017-05-10T00:25:54+5:30
पनवेल येथील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली त्याला चार दिवस झाले तरी शासकीय मदत मिळाली नव्हती. आगीत नुकसान झालेली
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल येथील इंदिरानगर झोपडपट्टीला आग लागली त्याला चार दिवस झाले तरी शासकीय मदत मिळाली नव्हती. आगीत नुकसान झालेली सात कुटुंबे शेजाऱ्यांकडे रहात होती. त्यावेळी अॅड. मनोज भुजबळ यांनी मदत केली नसती तर आमचे जगणे कठीण झाले असते, अशी प्रतिक्रिया आगीत घरे भस्मसात झालेल्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
पनवेलमधील प्रभाग १७ मधील संतोष कीर्तीकर, अनंता पवार, अब्दुल्ला आलम, गणेश शिंदे रा. शिवाजी नगर, तानाजी शिंदे, सूर्यकांत बावस्कर रा. नवनाथ नगर व सुनील गुंजाळ, आझाद नगर यांनी ८ मे रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी आपल्या आठवणी जाग्या केल्या.
७ फेब्रुवारी रोजी इंदिरा नगर झोपडपट्टीला आग लागली त्यावेळी आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. नैसर्गिक आपत्ती नसल्याने त्यांना शासकीय मदत मिळाली नव्हती. अनेक जण येऊन फोटो काढून मदतीचे आश्वासन देऊन जात होते. मात्र प्रत्यक्षात कोणीही मदत केली नाही. यावेळी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ व सुशीला घरत यांनीच पहिली आर्थिक मदत केल्याचे आपत्तीग्रस्तांनी सांगितले.