शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

चिमुकल्याच्या मृतदेहासह महिलेची वाशी खाडी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 1:38 AM

वाशी खाडीपुलावर गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वेतून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली.

नवी मुंबई : एक वर्षाच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहासह महिलेने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेदरम्यान पोलिसांनी तिच्याकडील बॅग तपासली असता त्यामध्ये एक वर्षाच्या मुलाचे धड व शीर आढळून आले. हा मृतदेह सोबत घेऊन तिने रेल्वेने पुणे ते वाशीपर्यंत प्रवास केला.वाशी खाडीपुलावर गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वेतून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता महिलेचा मृत्यू झाल्याचे आढळले. बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक वर्षाच्या मुलाचे धड व शीर आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा पुण्यातून ती पळून आली असल्याचे समोर आले. एक वर्षांपूर्वी तिने मुलाला जन्म दिला होता. या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन दिवस आधीच ती निघून गेली होती. यादरम्यान तिनेच मुलाची हत्या करून शीर व धड वेगळे करून बॅगमध्ये स्वत:सोबत ठेवून मुंबई गाठल्याचा पोलिसांना संशय आहे. बॅगेमध्ये मृतदेह सोबत घेऊन तिने पुणे ते वाशीपर्यंत रेल्वेने प्रवास केल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तिचे मानसिक संतुलन बिघडले असून यातूनच तिने हे कृत्य केले असावे, अशीही शक्यता असल्याचे पो. नि. विष्णू केसरकर यांनी सांगितले. तरीही याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.