महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:12 AM2018-11-15T03:12:38+5:302018-11-15T03:13:09+5:30
अंधेरी लोखंडवाला परिसरातील घटना : दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
मुंबई : त्वचा तज्ज्ञ महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार रविवारी अंधेरीत घडला. या हल्ल्यामागचे कारण अद्याप
अस्पष्ट असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक चौकशी करत आहेत. नसरीन खान (४०) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे अंधेरीतील ओशिवरा मार्केट परिसरात क्लिनिक आहे. खान या रविवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या क्लिनिकमध्ये एका रुग्णावर उपचार करत होत्या. त्यादरम्यान हेल्मेट घातलेले दोन इसम त्यांच्या क्लिनिकमध्ये दाखल झाले.
त्यांनी क्लिनिकमधील कर्मचाऱ्याला आवाज देत खान यांना बोलविण्यास सांगितले. काही वेळाने खान बाहेर आल्या. तेव्हा त्या अनोळखी इसमाने त्यांच्या मानेवर तलवार ठेवली तर दुसºयाने चॉपर आणि चाकूने त्यांच्या चेहºयावर अनेक वार केले. त्यानंतर ते मोटारसायकलवर बसून पसार झाले. डॉक्टरने आरडाओरड केली. मात्र गजबजलेल्या परिसरातही हल्लेखोरांना पकडण्याची हिंमत कोणीच केली नाही. या घटनेनंतर खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी खान यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
केली आहे.
सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी
यासंदर्भात अधिक माहिती देताना तपास अधिकाºयांनी सांगितले की, क्लिनिक तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यात येत असून दोन्ही हल्लेखोरांनी डोक्यात हेल्मेट परिधान केल्याने त्यांचे चेहरे ओळखण्यात अडथळा येत आहे.
च्अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरू आहे.