१२ लाखांची खंडणी घेताना महिला वकिलास अटक; हॉटेल व्यवसायिकांकडे मागितली होती २० लाखांची रक्कम

By कमलाकर कांबळे | Published: May 30, 2024 08:11 PM2024-05-30T20:11:05+5:302024-05-30T20:11:34+5:30

कारवाई टाळायची असेल तर २० लाख रूपये द्यावे लागतील, असे तिने व्यवसायिकांना सांगितले. 

Woman lawyer arrested while accepting extortion of 12 lakhs An amount of 20 lakhs was demanded from the hoteliers | १२ लाखांची खंडणी घेताना महिला वकिलास अटक; हॉटेल व्यवसायिकांकडे मागितली होती २० लाखांची रक्कम

१२ लाखांची खंडणी घेताना महिला वकिलास अटक; हॉटेल व्यवसायिकांकडे मागितली होती २० लाखांची रक्कम

नवी मुंबई: हॉटेल व्यवसायिकांकडून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि तडजोडीनंतर १२ लाखांचा स्वीकार करताना एका महिला वकिलास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. तिचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हॉटेल व्यवसायिक किशोर रत्नाकर शेट्टी आणि त्यांच्या भागीदारीत चालणाऱ्या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार व्यवसायाने वकील असलेल्या महिलेने केली होती. 

या तक्रारीच्या अनुषंगाने किशोर शेट्टी आणि संबधित इतर व्यवसायिकांनी १३ मे रोजी वाशी सेक्टर ३० येथील तुंगा हॉटेलमध्ये तिची भेट घेतली. तुम्ही सर्वजण बेकायदेशीररित्या हॉटेल चालवित आहात. मोठे अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यावरील कारवाईसाठी मी यापूर्वीच महापालिका आणि मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे. कारवाई टाळायची असेल तर २० लाख रूपये द्यावे लागतील, असे तिने या व्यवसायिकांना सांगितले. 

त्यानंतर किशोर शेट्टी यांच्यासह संबधित इतर व्यवसायिकांनी आरोपीच्या सांगण्यावरून पुन्हा २२ मे रोजी याच हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यावेळी खंडणीच्या रक्कमेत तडजोड करून ती १२ लाखांवर मान्य करण्यात आली. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार पोलिस सह आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील शिंदे, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलम पवार यांच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार २९ मे रोजी त्याच हॉटलमध्ये खंडणी स्वरुपात १० हजारांचे खरे चलन आणि ११ लाख ९० हजार रुपयांचे बनावट चलन अशी बारा लाखांची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी तिला अटक केली. ही महिला आणि तिच्या साथीदाराच्या विरोधात वाशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३८४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Woman lawyer arrested while accepting extortion of 12 lakhs An amount of 20 lakhs was demanded from the hoteliers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.