कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी, सानपाडा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 10:21 PM2019-07-07T22:21:36+5:302019-07-07T22:25:51+5:30
भटक्या कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला आहे.
नवी मुंबई - भटक्या कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला आहे. पहाटेच्या वेळी मोराज सोसायटीत दबा धरुन बसलेल्या कुत्र्यांनी या महिलेवर हल्ला केला. तर अचानकपने कुत्र्यांकडून झालेल्या हल्यात महिला खाली कोसळल्यानंतर देखिल कुत्र्यांकडून तिच्या शरीराचे लचके तोडले जात होते. या प्रकारामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
सानपाडा येथील मोराज रेसीडेंसी या सोसायटीत शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणारया प्रेमा सिंग ह्या कामानिमित्ताने घराबाहेर निघाल्या होत्या. यावेळी त्या जिन्यावरुन खाली उतरत असतानाच त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या दोन कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामद्ये त्या खाली कोसळल्या असता, दोन्ही कुत्र्यांनी त्यांच्या शरीराचे लचके तोडण्यास सुरवात केली. त्यांनी या कुत्र्यांपासून स्वतची सुटका करुन घेण्याचा प्रयlत्न करुन देखिल कुत्र्यांकडून चावा घेतलाच जात होता. यामुळे काही वेळातच त्या गंभीर जखमी होवून रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळीच कोसळल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिथल्या नागरीकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, प्रेमा सिंग यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांनी सोसायटीत प्रवेश करुन केलेल्या या हल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
शहरातील सर्वच नोडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर यापुर्वी देखिल भटक्या कुत्र्यांकडून नागरीकांवर हल्याचे प्रकार घडले आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर कुत्र्यांकडून हल्याचेही प्रकार सुरुच आहेत. परिसरातील कचरा कुंडय़ांच्या ठिकाणी टोळ्या टोळ्याने या कुत्र्यांची वाढ होत आहे. त्यांच्याकडून आपापली हद्द देखिल ठरवली जात असल्याने एका परिसरातील भटका कुत्र दुसरया परिसरात आल्यास त्यांच्यात भर रस्त्यात टोळी युध्द रंगत आहेत. तर हे कुत्रे रस्त्यावर भरधाव वाहनांच्या आडवे येत असल्याने अपघातांच्याही घटना घडत आहेत. यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर प्रशासनाकडून वेळीच नियंत्रण मिळवले जान्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र दिवसेंदिव शहरातील कुत्र्यांच्या संख्येत वाढ होतानाच दिसत आहे. यामुळे भटकी कुत्री पकडण्यासह त्यांच्या निर्बिजीकरणाच्या मोहीमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मोराज रेसिडेंसी सोसायटीत घुसून भटक्या कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केल्याची घटना गंभीर आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून यापुर्वी देखिल भटक्या कुत्र्यांकडून नागरीकांवर हल्याचे प्रकार घडले आहेत. परंतु त्यानंतरही भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत योग्य उपाय योजना राबवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे नागरीकांना रस्त्यावर चालण्यासह सोसायटी आवारात देखिल कुत्र्यांपासून जिव मुठीत घेवून चालावे लागत आहे.
वैजयंती दशरथ भगत, नगरसेविका