शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी, सानपाडा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 10:21 PM

भटक्या कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला आहे.

नवी मुंबई - भटक्या कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला आहे. पहाटेच्या वेळी मोराज सोसायटीत दबा धरुन बसलेल्या कुत्र्यांनी या महिलेवर हल्ला केला. तर अचानकपने कुत्र्यांकडून झालेल्या हल्यात महिला खाली कोसळल्यानंतर देखिल कुत्र्यांकडून तिच्या शरीराचे लचके तोडले जात होते. या प्रकारामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.सानपाडा येथील मोराज रेसीडेंसी या सोसायटीत शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणारया प्रेमा सिंग ह्या कामानिमित्ताने घराबाहेर निघाल्या होत्या. यावेळी त्या जिन्यावरुन खाली उतरत असतानाच त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या दोन कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामद्ये त्या खाली  कोसळल्या असता, दोन्ही कुत्र्यांनी त्यांच्या शरीराचे लचके तोडण्यास सुरवात केली. त्यांनी या कुत्र्यांपासून स्वतची सुटका करुन घेण्याचा प्रयlत्न करुन देखिल कुत्र्यांकडून चावा घेतलाच जात होता. यामुळे काही वेळातच त्या गंभीर जखमी होवून रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळीच कोसळल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिथल्या नागरीकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, प्रेमा सिंग यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांनी सोसायटीत प्रवेश करुन केलेल्या या हल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.शहरातील सर्वच नोडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर यापुर्वी देखिल भटक्या कुत्र्यांकडून नागरीकांवर हल्याचे प्रकार घडले आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर कुत्र्यांकडून हल्याचेही प्रकार सुरुच आहेत. परिसरातील कचरा कुंडय़ांच्या ठिकाणी टोळ्या टोळ्याने या कुत्र्यांची वाढ होत आहे. त्यांच्याकडून आपापली हद्द देखिल ठरवली जात असल्याने एका परिसरातील भटका कुत्र दुसरया परिसरात आल्यास त्यांच्यात भर रस्त्यात टोळी युध्द रंगत आहेत. तर हे कुत्रे रस्त्यावर भरधाव वाहनांच्या आडवे येत असल्याने अपघातांच्याही घटना घडत आहेत. यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर प्रशासनाकडून वेळीच नियंत्रण मिळवले जान्याची  गरज व्यक्त होत आहे. मात्र दिवसेंदिव शहरातील कुत्र्यांच्या संख्येत वाढ होतानाच दिसत आहे. यामुळे भटकी कुत्री पकडण्यासह त्यांच्या निर्बिजीकरणाच्या मोहीमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मोराज रेसिडेंसी सोसायटीत घुसून भटक्या कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केल्याची घटना गंभीर आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून यापुर्वी देखिल भटक्या कुत्र्यांकडून नागरीकांवर हल्याचे प्रकार घडले आहेत. परंतु त्यानंतरही भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत योग्य उपाय योजना राबवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे नागरीकांना रस्त्यावर चालण्यासह सोसायटी आवारात देखिल कुत्र्यांपासून जिव मुठीत घेवून चालावे लागत आहे.वैजयंती दशरथ भगत, नगरसेविका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईdogकुत्रा