विधिमंडळाची महिला व बालहक्क व कल्याण समिती दि. 28 ते 30 सप्टेंबर या काळात नवी मुंबई दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 05:57 PM2021-09-23T17:57:41+5:302021-09-23T17:58:14+5:30

विधीमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीचे सदस्य दि. 28 ते 30 सप्टेंबर 2021 या काळात नवी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Women and Child Rights and Welfare Committee of the Legislature On a tour of Navi Mumbai from September 28 to 30 | विधिमंडळाची महिला व बालहक्क व कल्याण समिती दि. 28 ते 30 सप्टेंबर या काळात नवी मुंबई दौऱ्यावर

विधिमंडळाची महिला व बालहक्क व कल्याण समिती दि. 28 ते 30 सप्टेंबर या काळात नवी मुंबई दौऱ्यावर

Next

ठाणे - विधीमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीचे सदस्य दि. 28 ते 30 सप्टेंबर 2021 या काळात नवी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते विविध विभागांच्या योजना/प्रकल्प/कामे या ठिकाणी भेट देणार आहेत.

  विधानमंडळाची ही समिती महिला व बाल विकास विभाग, नगर विकास विभाग (नवी मुंबई महानगरपालिका व सिडको), गृहनिर्माण विभाग, सार्वजनिक विभाग, सामाजिक न्याय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग, गृह, उद्योग, ऊर्जा व कामगार, उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्यांक, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना, प्रकल्प व कामांचा आढावा घेणार आहे. तसेच या कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेणार आहे. ही समिती मंगळवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे स्थानिक लोकप्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करणार आहेत. त्यानंतर संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सकाळी 11.45 वा. ते दु.2.00 वा आणि दु. 3.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत नवी मुंबईतील विविध विभागाच्यामार्फत राबिण्यात येणाऱ्या योजना/प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देणार आहे.

बुधवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वा ते दु.2.00 वा आणि दु. 3.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत विविध ठिकाणांना समिती भेट देणार आहे. गुरुवारी दि. 30 सप्टेंबर रोजी स.10.00 ते दु. 3.00 वाजेपर्यंत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे.
 

Web Title: Women and Child Rights and Welfare Committee of the Legislature On a tour of Navi Mumbai from September 28 to 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.