खालापूर : पहिल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा बहुमान अपेक्षेप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाच्या शिवानी जंगम यांना मिळाला असून उपनगराध्यक्षपद देखील महिलेकडे सोपवून शेकापने खालापूर विकासाची चावी महिलांच्या हाती सुपूर्द केली आहे. सोमवारी खालापूर नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १० जागी शेकापने निर्विवाद विजय संपादन केला होता. त्यामुळे नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद शेकापकडे राहणार हे निश्चित होते. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेविकांमुळे संख्याबळ वाढून १२ झाले होते. नगराध्यक्षपदासाठी शेकापकडून शिवानी जंगम यांचा अर्ज आला होता, तर विरोधात शिवसेनेच्या सुरेखा पवार यांनी अर्ज दाखल केला होता. उपनगराध्यक्षपदासाठी शेकापकडून संध्या मगर यांनी अर्ज दाखल केला होता. पीठासीन अधिकारी शशिकांत नाचण, मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांनी हात उंचावून घेतलेल्या निवडणुकीत शेकापच्या शिवानी जंगम यांना १२ तर सेनेच्या सुरेखा पवार यांना ५ मते मिळाली.(वार्ताहर)१माणगांव : नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंद शिवराम यादव तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नाकर बाळाराम उभारे यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली. माणगांव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १० व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष नगरसेवक १ असे ११ नगरसेवक होते. बा देण्याचे जाहीर केले. मात्र सभागृहात उशिरा पोहचल्याने नगराध्यक्षपदाच्या मतदानात सहभागी होता आले नाही. परंतु उननगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंद यादव यांना ११ मते तर शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन बोंबले यांना ५ मते तर उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार रत्नाकर उभारे यांना १२ मते तर शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सानिया शेट यांना ५ मते मिळाली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी तमाम माणगांवकरांचे आभार मानीत माणगांवच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले. (वार्ताहर)२शिवसेनेचे ४ व शिवसेना पुरस्कृत अपक्ष १ असे ५ नगरसेवक होते तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १ नगरसेवक असे पक्षीय बलाबल होते. यावेळी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आनंद यादव यांनी तर शिवसेनेतर्फे सचिन बोंबले यांनी अर्ज दाखल केले होते. ३ नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंद यादव यांना ११ मते तर शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन बोंबले यांना ५ मते तर उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार रत्नाकर उभारे यांना १२ मते तर शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सानिया शेट यांना ५ मते मिळाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
खालापूर विकासाची चावी महिलांच्या हाती
By admin | Published: January 26, 2016 2:07 AM