शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
3
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
5
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
6
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र
7
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
8
Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 
9
कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट
10
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
11
बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य
12
'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस...
13
यामी गौतमच्या लेकाच्या नावाची झाली चर्चा, 'वेदविद'चा अर्थ सांगत अभिनेत्री म्हणाली...
14
पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी
15
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
16
Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला 'या' वेळेतच कार्तिकेयाचे दर्शन घ्या; आर्थिक चिंतेतून मुक्त व्हा!
17
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
18
अधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या नरेश मीणाला अटक, सामरावता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
19
F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट
20
"आयुष्याच्या चौकटीत अडकलो...", सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना

महिलांनी वाहतुकीचे नियम पाळावेत

By admin | Published: January 18, 2016 2:15 AM

सध्या सर्वच क्षेत्रांत एक पाऊल पुढे असलेल्या महिलांनी वाहतुकीचे नियम पाळण्यातही अव्वल राहावे, असे आवाहन अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी केले.

नवी मुंबई : सध्या सर्वच क्षेत्रांत एक पाऊल पुढे असलेल्या महिलांनी वाहतुकीचे नियम पाळण्यातही अव्वल राहावे, असे आवाहन अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी केले. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित महिला मोटारसायकल रॅलीला त्या उपस्थित होत्या. रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांबाबात जनजागृती करण्यात आली.रस्ते अपघात टाळण्यासाठी चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यानुसार सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत वाशी वाहतूक पोलिसांच्या वतीने महिला मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिने अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, वाहतूक उपायुक्त अरविंद साळवे, क्रीडापट्टू अभिलाषा म्हात्रे, वाहतूक विभाग वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार आदी उपस्थित होते. तर वाशी ते खारघरदरम्यान काढलेल्या या मोटारसायकल रॅलीमध्ये ७० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा घडलेला किरकोळ अपघात त्याचे अथवा सहप्रवाशाचे प्राण घेऊ शकतो. त्यामुळे सिग्नल लागलेला असताना अवघ्या एक मिनिटासाठी सिग्नल तोडण्याची घाई न करता थांबावे. आपल्यालाही वाहन चालवायची खूप आवड आहे. मात्र हाताच्या दुखण्यामुळे ती पूर्ण करू शकत नाही. परंतु मुलीसोबत जेव्हा कारमधून घराबाहेर जायची वेळ येते तेव्हा दोघीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत असल्याचेही सुप्रिया यांनी सांगितले. सर्वच चालक महिलांनी दक्षता घेऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यातही आघाडी घ्यावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)