नवी मुंबई विमानतळाचं काम बंद पाडण्याचा महिलांचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 12:20 PM2018-04-27T12:20:05+5:302018-04-27T12:20:05+5:30
सिडकोने ४४ सुरक्षा रक्षकाना महामंडळातून तडकाफडकी कामावरून काढल्यामुले येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
पनवेल: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र सिडकोने ४४ सुरक्षा रक्षकाना महामंडळातून तडकाफडकी कामावरून काढल्यामुले येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याकरीता २६ रोजी ग्रामस्थानी बैठक घेवून सिडको विरोधात लढा उभारण्याचा इशारा दिला.
शुक्रवारी ओवले गावातील महिलानी विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला.येथील गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता सिडकोमार्फत बंद करण्यात येत असताना गावातील महिलानी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पनवेल शहर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसाच्या मध्यस्ती काम पुन्हा सुरळीत करण्यात आले. यावेळी महिलावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पनवेल शहर पोलिसांनी सांगितले.