महिला होणार सुरक्षित!

By admin | Published: August 24, 2015 02:26 AM2015-08-24T02:26:14+5:302015-08-24T02:26:14+5:30

महिलांवर वाढत्या हल्ल्यांसह अत्याचारांपासून त्यांना संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मीरा-भार्इंदर विभागाने प्रथमच स्मार्ट

Women will be safe! | महिला होणार सुरक्षित!

महिला होणार सुरक्षित!

Next

भार्इंदर : महिलांवर वाढत्या हल्ल्यांसह अत्याचारांपासून त्यांना संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मीरा-भार्इंदर विभागाने प्रथमच स्मार्ट फोनमध्ये वापरता येण्याजोगे नवीन अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप लवकरच मीरा-भार्इंदरकर महिलांना उपलब्ध करण्यात येणार असल्याने मोबाइलद्वारे महिलांचे संरक्षण पोलीसदादा करणार असल्याचे उपअधीक्षक सुहास बावचे यांनी लोकमतला सांगितले.
रात्री उशिरा कामावरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे, काही अपप्रवृत्तींमुळे त्यांच्यावर अत्याचारासारखा प्रसंग ओढवल्यास त्यांना त्वरित मदतीचा आधार मिळावा, या उद्देशाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मीरा-भार्इंदर विभागाने स्मार्ट फोनवरील अ‍ॅपप्रमाणे सुरक्षा अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला होता. ते अ‍ॅप लवकरच मीरा-भार्इंदरकर महिलांना उपलब्ध करण्यात येणार असून त्याची चाचपणी सध्या सुरू आहे.
हे सुरक्षा अ‍ॅप स्मार्ट फोनमधील अँड्रॉइड तसेच अ‍ॅपल आय फोनमधील आयओएस आॅपरेटिंग सिस्टीमवरच वापरता येणार आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी महिलांना सुरुवातीला ते मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर, महिलांनी स्वत:ची सर्व माहिती त्यामध्ये अर्जाच्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या रकान्यांत भरून त्याची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही माहिती शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील संगणकांमध्ये साठविली जाणार असून त्याचा अ‍ॅलर्ट महिलांसंबंधित घटनास्थळा जवळील पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे. हे सुरक्षा अ‍ॅप केवळ मीरा-भार्इंदर हद्दीतच वापरता येणार असले तरी येथील महिला शहराबाहेर असताना त्यांच्यावरील संकटसमयी त्यांना मदत करण्यासाठी पोलीस हे अ‍ॅप विस्तारित करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women will be safe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.