शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

महिला होणार सुरक्षित!

By admin | Published: August 24, 2015 2:26 AM

महिलांवर वाढत्या हल्ल्यांसह अत्याचारांपासून त्यांना संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मीरा-भार्इंदर विभागाने प्रथमच स्मार्ट

भार्इंदर : महिलांवर वाढत्या हल्ल्यांसह अत्याचारांपासून त्यांना संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मीरा-भार्इंदर विभागाने प्रथमच स्मार्ट फोनमध्ये वापरता येण्याजोगे नवीन अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप लवकरच मीरा-भार्इंदरकर महिलांना उपलब्ध करण्यात येणार असल्याने मोबाइलद्वारे महिलांचे संरक्षण पोलीसदादा करणार असल्याचे उपअधीक्षक सुहास बावचे यांनी लोकमतला सांगितले.रात्री उशिरा कामावरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे, काही अपप्रवृत्तींमुळे त्यांच्यावर अत्याचारासारखा प्रसंग ओढवल्यास त्यांना त्वरित मदतीचा आधार मिळावा, या उद्देशाने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मीरा-भार्इंदर विभागाने स्मार्ट फोनवरील अ‍ॅपप्रमाणे सुरक्षा अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला होता. ते अ‍ॅप लवकरच मीरा-भार्इंदरकर महिलांना उपलब्ध करण्यात येणार असून त्याची चाचपणी सध्या सुरू आहे. हे सुरक्षा अ‍ॅप स्मार्ट फोनमधील अँड्रॉइड तसेच अ‍ॅपल आय फोनमधील आयओएस आॅपरेटिंग सिस्टीमवरच वापरता येणार आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी महिलांना सुरुवातीला ते मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर, महिलांनी स्वत:ची सर्व माहिती त्यामध्ये अर्जाच्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या रकान्यांत भरून त्याची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही माहिती शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील संगणकांमध्ये साठविली जाणार असून त्याचा अ‍ॅलर्ट महिलांसंबंधित घटनास्थळा जवळील पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे. हे सुरक्षा अ‍ॅप केवळ मीरा-भार्इंदर हद्दीतच वापरता येणार असले तरी येथील महिला शहराबाहेर असताना त्यांच्यावरील संकटसमयी त्यांना मदत करण्यासाठी पोलीस हे अ‍ॅप विस्तारित करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)