कुटुंब नियोजनात महिला सॉफ्ट टार्गेट

By admin | Published: July 14, 2015 11:17 PM2015-07-14T23:17:41+5:302015-07-14T23:17:41+5:30

पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आजही समाजात मोठ्या प्रमाणात जाणवतो. सरकार आणि प्रशासन एखादा उपक्रम राबवते तेव्हाही स्त्रियाच सॉफ्ट टार्गेट होताना दिसतात.

Women's soft targets in family planning | कुटुंब नियोजनात महिला सॉफ्ट टार्गेट

कुटुंब नियोजनात महिला सॉफ्ट टार्गेट

Next

- आविष्कार देसाई,  अलिबाग
पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आजही समाजात मोठ्या प्रमाणात जाणवतो. सरकार आणि प्रशासन एखादा उपक्रम राबवते तेव्हाही स्त्रियाच सॉफ्ट टार्गेट होताना दिसतात. रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या कुटुंब कल्याण कार्यक्रमात स्त्रियांचाच टक्का अधिक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
लोकसंख्या आटोक्यात राहावी यासाठी सरकार विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. ‘मंत्र सुखी संसाराचा, दोन मुलांमध्ये तीन वर्षे अंतराचा’ असे स्लोगन आरोग्य विभागाने तयार केले आहे. याच माध्यमातून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदी शस्त्रक्रिया, गर्भनिरोधक गोळ््या, तांबी, निरोध यासारखे अन्य पर्याय नागरिकांपुढे आहेत.
सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट ठरवून दिले जाते. त्यानुसार आरोग्य यंत्रणेमार्फत कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविला जातो. शहरात अथवा ग्रामीण भागात कुटुंब नियोजनासाठी नसबंदी शस्त्रक्रियेसाठी महिलाच पुढाकार घेताना दिसतात तर पुरुष अशी शस्त्रक्रिया करून घेण्यापासून दूर जातात.
१९९९-२००० ते २०१४-२०१५ या कालावधीमध्ये एक लाख ९१ हजार ९७६ जणांची नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये महिलांचा आकडा तब्बल १ लाख ७२ हजार ८५७ असा आहे, तर केवळ २ हजार १५४ पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. २००४-०५ या कालावधीत सर्वाधिक १५ हजार ३२० नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महिलांचे प्रमाणे हे १४ हजार २५८, तर पुरुषांचे प्रमाण हे फक्त १ हजार ६२ होते.
सध्या पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येतात, मात्र कुटुंब नियोजनाची वेळ येते तेव्हा स्त्रियांनाच पुढे केले जाते.

नसबंदी शस्त्रक्रियेबाबत बरेच गैरसमज आहेत. महिलांपेक्षा पुरुषांची शस्त्रक्रिया सोपी आणि कमी त्रासाची आहे. मात्र पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच या शस्त्रक्रियेसाठी सहज तयार होतात.
- डॉ. बाळासाहेब जगदाळे,
स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ

त्याग करणे, कष्ट करणे हे महिलांचेच काम आहे. त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना सहज टार्गेट केले जाते.आदिवासी, कातकरी महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो.
- वैशाली पाटील, कार्यकर्त्या

शस्त्रक्रियेची आकडेवारी
वर्षपुरुष स्त्री
१९९९-२०००१४११,३२६
२०००-०१ १६११,९९८
२००१-०२ ४४ १३६६४
२००२-०३ ८८ ११,०८३
२००३-०४ १२९ १४०७३
२००४-०५ १०६२ १४,२५८
२००५-०६ ४३९ १३,५६५
२००६-०७ ५८ ११,८५२
२००७-०८ ९८ १०,८२३
२००८-०९ २९ ९७४८
२००९-१० ४८ ९४६३
२०१०-११ ५१ ८०८३
२०११-१२ ४३ ८०८१
२०१२-१३ २५ ८५५४
२०१३-१४ ३३ ८६३५
२०१४-१५ ०७ ७६५१
एकूण २१५४ १,७२,८५७

Web Title: Women's soft targets in family planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.