योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये फिरायला येणाºया नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पार्कमध्ये येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही त्यामुळे वंडर्स पार्कआणि या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे पार्कमध्ये एखादी गंभीर घटना होणे नाकारता येत नसून पालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई शहराच्या आकर्षणात भर घालणाºया आणि शहराचा नावलौकिक वाढविणाºया नेरु ळ येथे महापालिकेने निर्माण केलेल्या वंडर्स पार्कमध्ये शहरातून आणि शहराबाहेरून येणाºया नागरिकांची संख्या वाढली आहे. लहान मुलांबरोबर मोठ्यांना देखील मौजमजा करता येईल अशा प्रकारची आकर्षक खेळणी या उद्यानात बसविण्यात आली असल्याने उद्यान नागरिक आणि बच्चे कंपनींचे आकर्षण ठरले आहे. पार्कचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी ३५ रु पये तर लहान मुलांसाठी २५ रु पये आकारण्यात येत असले तरी देखील पार्कमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी आहेत. पार्कची आणि येथे येणाºया नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेची आहे. परंतु पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पार्कमध्ये येणाºया नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे या पार्कमध्ये येणाºया सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पार्कची सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे काम करते याचा आम्ही स्टिंग आॅपरेशन करून प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीमध्ये एका व्यक्तीकडे शस्त्र देण्यात आले होते. पार्कच्या प्रवेशद्वारावर तिकीट काढल्यावर त्या व्यक्तीने सुरक्षा रक्षकाला तिकीट दाखवून पार्कमध्ये सहज प्रवेश केला. त्यानंतर शस्त्र बाळगून पार्कमध्ये सगळीकडे वावरला असताना देखील अडवले नाही.यामुळे महापालिकेच्या पार्कची सुरक्षा यंत्रणा किती तकलादू आहे याचा अनुभव आला आहे. पार्कमध्ये येणारे नागरिक बॅगा, पिशव्या घेऊन येतात. नागरिकांना तसेच त्यांच्याकडे असलेल्या पिशव्या, बॅगा तपासण्यासाठी मेटल डिटेक्टरसारखी यंत्रणा पार्कमध्ये उपलब्ध नाही.वंडर्स पार्कमध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक फक्त तिकीट तपासण्याचे काम करतात, नागरिकांकडे असलेल्या बॅगा, पिशव्या तपासल्या जात नाहीत. पार्कमध्ये तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे वंडर्स पार्क नागरिकांसाठी असुरक्षित आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने सुरक्षा यंत्रणा सुरू करणे गरजेचे आहे.- किशोर पवार, नागरिक