अनलॉकनंतरही वंडर्स पार्क मुलांसाठी बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 01:03 AM2020-12-06T01:03:45+5:302020-12-06T01:04:03+5:30

Navi Mumbai News :   नवी मुंबई शहराचे आकर्षण असणाऱ्या नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात उद्यान बंद ठेवण्यात आले होते.

Wonders Park closed to children after unlock in Navi Mumbai | अनलॉकनंतरही वंडर्स पार्क मुलांसाठी बंदच

अनलॉकनंतरही वंडर्स पार्क मुलांसाठी बंदच

googlenewsNext

नवी मुंबई - लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून घरीच असलेल्या मुलांना पालक वंडर्स पार्क मध्ये घेऊन जात आहेत, परंतु पार्क खुले आहे की नाही, याबाबत वेबसाईटवर अपडेट केले असले, तरी प्रवेशद्वारावर सूचना फलक बसविल्याने पार्कच्या प्रवेशद्वारावर दररोज सायंकाळी नागरिकांची गर्दी होत आहे. वापरासाठी पार्क अद्याप खुले नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.

  नवी मुंबई शहराचे आकर्षण असणाऱ्या नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात उद्यान बंद ठेवण्यात आले होते. अनलॉक करताना टप्प्यप्प्याने अनेक गोष्टी नागरिकांसाठी खुल्या केल्या आहेत. विरंगुळ्यासाठी अनेक पालक मुलांना पार्कमध्ये घेऊन जात आहेत, परंतु पार्क सुरू आहे की नाही, याबाबत महापालिकेने या पार्कच्या प्रवेशद्वारावर कोणतेही फलक बसविले नाहीत.

पार्क बंद असल्याबाबत महापालिकेच्या वेबसाइटवरही कोणतेही अपडेट नसल्याने नवी मुंबईसह मुंबई, ठाणे रायगड जिल्ह्यातील नागरिक, लहान मुलांना पार्कच्या प्रवेशद्वारावरून परतावे लागत आहे. हे पाहता महापालिकेने दोन दिवसांपूर्वी वेबसाइटवर अपडेट केले आहे, परंतु पार्कच्या प्रवेशद्वारावर मात्र कोणतेही सूचना फलक बसविलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, दररोज अनेक नागरिक चौकशी करण्यासाठी प्रवेशद्वारावर गर्दी करीत आहेत. या पार्कच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक बसविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

मॉर्निंग वॉकसाठी ३ तास
येथे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकसाठी वंडर्स पार्क खुले ठेवले जात आहे.
 

Web Title: Wonders Park closed to children after unlock in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.