‘फिफा’साठी महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग, सुशोभीकरणाची कामे सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 06:46 AM2017-09-12T06:46:39+5:302017-09-12T06:46:53+5:30

फिफा सामन्यांसाठी २४ दिवस शिल्लक राहिली असल्याने महामार्ग दुरूस्तीसह शहरातील सुशोभीकरणाच्या कामांना वेग आला आहे. सरावासाठीच्या दोन्ही मैदानांचे काम अंतीम टप्यात आले आहे. महापालिकेनेही अत्यावश्यक कामे विनाविलंब करण्यास सुरवात केली असून ६ आॅक्टोंबरपुर्वीच सर्व अत्यावश्यक कामे पुर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

The work for beautification of highways for FIFA, beautification work, continue | ‘फिफा’साठी महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग, सुशोभीकरणाची कामे सुरू  

‘फिफा’साठी महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग, सुशोभीकरणाची कामे सुरू  

Next

नवी मुंबई : फिफा सामन्यांसाठी २४ दिवस शिल्लक राहिली असल्याने महामार्ग दुरूस्तीसह शहरातील सुशोभीकरणाच्या कामांना वेग आला आहे. सरावासाठीच्या दोन्ही मैदानांचे काम अंतीम टप्यात आले आहे. महापालिकेनेही अत्यावश्यक कामे विनाविलंब करण्यास सुरवात केली असून ६ आॅक्टोंबरपुर्वीच सर्व अत्यावश्यक कामे पुर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
देशात संपन्न होणाºया १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी यजमान शहराचा (होस्ट सिटी) मान नवी मुंबईला मिळाला आहे. यासाठीच्या होस्ट सिटी लोगोचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आले. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये ६ आॅक्टोंबरला पहिला सामना होणार आहे. या सामन्यापुर्वी सायन - पनवेल महामार्ग व शहरात महत्वाच्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामे पुर्ण केली जाणार आहेत. महापालिका वाशी ते बेलापूर दरम्यान महत्वाच्या ठिकाणी बलून्स व होर्डींग्ज लावणार आहे. याशिवाय वाहतूक बेटांबरोबरच स्टेडीयम परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. सिवूडमध्ये यशवंतराव चव्हाण मैदानावर सराव सामने होणार आहेत. यासाठी मैदानावरील सर्व कामे अंतीम टप्यात आहेत. वाशीत एनएमएसएच्या मैदानावरही सराव सामने होणार असून सर्व कामे पुर्ण करण्यात आली आहेत.
फिफा सामन्यांपुर्वी सायन - पनवेल महामार्गाच्या दुरूस्तीची कामे पुर्ण करण्याचे आव्हान महापालिका व बांधकाम विभागाच्या समोर उभे आहे. जुनपासून नागरीक, प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही प्रशासनाने योग्य दखल घेतली नव्हती. पोलिसांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरही काहीच फरक पडला नव्हता. पण फिफा सामन्यानिमीत्ताने दुरूस्तीची कामे वेगाने सुरू केली आहेत. तुर्भे उड्डाणपुलापासून नेरूळपर्यंत सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात येणार आहेत. पुलाखालील बेकायदेशीर पार्किंग बंद केली आहे. भिकाºयांनाही पुलाखालून हाकलण्यात आले आहे. सामन्यांसाठी फक्त २४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या वेळेत महामार्ग रूंदीकरणाची रखडलेली सर्व कामे पुर्ण करणे हेच बांधकाम विभाग, राज्य शासन व महापालिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. 
फिफा सामन्यांमुळे जगातील २०९ देशांमध्ये नवी मुंबईचा नावलौकिक होणार आहे. यजमान शहर म्हणून नियोजनामध्ये कोणत्याही उणिवा राहणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. सुशोभीकरणाची व आवश्यक दुरूस्तीची कामे वेगाने सुरू केली आहेत. सीवूडमध्ये सरावासाठी विशेष मैदान विकसित करण्यात आले असून वेळेत सर्व कामे पूर्ण केली जातील.
- सुधाकर सोनावणे,
महापौर, नवी मुंबई
 

Web Title: The work for beautification of highways for FIFA, beautification work, continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.