शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

‘फिफा’साठी महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग, सुशोभीकरणाची कामे सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 6:46 AM

फिफा सामन्यांसाठी २४ दिवस शिल्लक राहिली असल्याने महामार्ग दुरूस्तीसह शहरातील सुशोभीकरणाच्या कामांना वेग आला आहे. सरावासाठीच्या दोन्ही मैदानांचे काम अंतीम टप्यात आले आहे. महापालिकेनेही अत्यावश्यक कामे विनाविलंब करण्यास सुरवात केली असून ६ आॅक्टोंबरपुर्वीच सर्व अत्यावश्यक कामे पुर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

नवी मुंबई : फिफा सामन्यांसाठी २४ दिवस शिल्लक राहिली असल्याने महामार्ग दुरूस्तीसह शहरातील सुशोभीकरणाच्या कामांना वेग आला आहे. सरावासाठीच्या दोन्ही मैदानांचे काम अंतीम टप्यात आले आहे. महापालिकेनेही अत्यावश्यक कामे विनाविलंब करण्यास सुरवात केली असून ६ आॅक्टोंबरपुर्वीच सर्व अत्यावश्यक कामे पुर्ण करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.देशात संपन्न होणाºया १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी यजमान शहराचा (होस्ट सिटी) मान नवी मुंबईला मिळाला आहे. यासाठीच्या होस्ट सिटी लोगोचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आले. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये ६ आॅक्टोंबरला पहिला सामना होणार आहे. या सामन्यापुर्वी सायन - पनवेल महामार्ग व शहरात महत्वाच्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामे पुर्ण केली जाणार आहेत. महापालिका वाशी ते बेलापूर दरम्यान महत्वाच्या ठिकाणी बलून्स व होर्डींग्ज लावणार आहे. याशिवाय वाहतूक बेटांबरोबरच स्टेडीयम परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. सिवूडमध्ये यशवंतराव चव्हाण मैदानावर सराव सामने होणार आहेत. यासाठी मैदानावरील सर्व कामे अंतीम टप्यात आहेत. वाशीत एनएमएसएच्या मैदानावरही सराव सामने होणार असून सर्व कामे पुर्ण करण्यात आली आहेत.फिफा सामन्यांपुर्वी सायन - पनवेल महामार्गाच्या दुरूस्तीची कामे पुर्ण करण्याचे आव्हान महापालिका व बांधकाम विभागाच्या समोर उभे आहे. जुनपासून नागरीक, प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही प्रशासनाने योग्य दखल घेतली नव्हती. पोलिसांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतरही काहीच फरक पडला नव्हता. पण फिफा सामन्यानिमीत्ताने दुरूस्तीची कामे वेगाने सुरू केली आहेत. तुर्भे उड्डाणपुलापासून नेरूळपर्यंत सर्व खड्डे तत्काळ बुजविण्यात येणार आहेत. पुलाखालील बेकायदेशीर पार्किंग बंद केली आहे. भिकाºयांनाही पुलाखालून हाकलण्यात आले आहे. सामन्यांसाठी फक्त २४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या वेळेत महामार्ग रूंदीकरणाची रखडलेली सर्व कामे पुर्ण करणे हेच बांधकाम विभाग, राज्य शासन व महापालिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. फिफा सामन्यांमुळे जगातील २०९ देशांमध्ये नवी मुंबईचा नावलौकिक होणार आहे. यजमान शहर म्हणून नियोजनामध्ये कोणत्याही उणिवा राहणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. सुशोभीकरणाची व आवश्यक दुरूस्तीची कामे वेगाने सुरू केली आहेत. सीवूडमध्ये सरावासाठी विशेष मैदान विकसित करण्यात आले असून वेळेत सर्व कामे पूर्ण केली जातील.- सुधाकर सोनावणे,महापौर, नवी मुंबई