कालवा वितरण प्रणालीची कामे ठप्प

By admin | Published: April 4, 2016 02:06 AM2016-04-04T02:06:23+5:302016-04-04T02:06:23+5:30

जलयुक्त शिवाराची कामे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरू असताना पेणमधील जलसमृद्धीचे श्रीमंतीचे वैभव धरणातच पडून आहे.

Work of canal distribution system jam | कालवा वितरण प्रणालीची कामे ठप्प

कालवा वितरण प्रणालीची कामे ठप्प

Next

पेण : जलयुक्त शिवाराची कामे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरू असताना पेणमधील जलसमृद्धीचे श्रीमंतीचे वैभव धरणातच पडून आहे. हेटवणे, आंबेघर धरणाचा पाणीसाठा कृषीक्षेत्रासाठी वापर करून पेणमधील ६६६८ हेक्टरवर सिंचनक्षेत्र अपेक्षित असताना राज्य शासनाने गेल्या पंधरा वर्षांत हेटवणे प्रकल्पाच्या वितरिकेची १८ किमी कामे केली आहे.
हेटवणे व आंबेघर धरणाच्या ओलिताखाली शेतजमीन आल्यास पेणमधील हरितक्रांतीद्वारे मुंबईसह उपनगरांना फ्रेश भाजीपाला, फळे पुरवठा होणार आहे. पेणच्या शेतकऱ्यांनी एसईझेड प्रकल्पाला हद्दपार केले. त्यामधील २२ गावे एसईझेड प्रकल्पात होती. तशीच या गावांचे क्षेत्र हेटवणे प्रकल्पांच्या ओलिताखाली ही होते. मात्र एसईझेड प्रकल्प २००५ साली आल्यानंतर हेटवणे कालवा विभागाने वितरिकेची कामे ठप्प केली.
भूमिगत कालव्यासाठी आलेले मोठमोठे सिमेंटचे पाइप आजतागायत पडून आहेत. पूर्वेला धरणाची रेलचेल तर पश्चिमेला अरबी समुद्रामार्गे मुंबई शहर तासभरात अंतरावर तर रेल्वे व बसप्रवास अडीच तासांचे अंतर येणाऱ्या प्रस्तावित प्रकल्प विकासकांनी तत्कालीन आघाडी सरकारच्या कालखंडात सक्तीचे भूसंपादन लादून जमिनी गिळंकृत करण्याचा डाव सपशेल फसला आणि शेष राहिला म्हणजे हेटवण्याच्या पाण्यावर हरितक्रांतीची नवी पालवी फुटावी ही समग्र शेतकऱ्यांची आशा आकांक्षा आहे.
या कामासाठी लागणारा निधी देण्यासाठी अप्पर सचिव वित्त व नियोजन विभागाने यासाठी भरीव तरतूद करून मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वर्षभरात ही कामे पूर्ण करावयाची असतील तर हेटवणे कालवा विभागाने मरगळ झटकून कामाला लागले पाहिजे.
(वार्ताहर)

Web Title: Work of canal distribution system jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.