दिवाळखोरीतील ठेकेदाराला उड्डाणपुलाचे काम, स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:22 AM2020-03-05T00:22:20+5:302020-03-05T00:23:05+5:30

तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधण्याचे काम दिवळखोरीत गेलेल्या ठेकेदारास देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

The work of a flyover to a bankruptcy contractor, the proposal approved by the Standing Committee | दिवाळखोरीतील ठेकेदाराला उड्डाणपुलाचे काम, स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

दिवाळखोरीतील ठेकेदाराला उड्डाणपुलाचे काम, स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

Next

नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधण्याचे काम दिवळखोरीत गेलेल्या ठेकेदारास देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. उड्डाणपूल बांधण्यासाठी ३० कोटी ५४ लाख रुपये खर्च येणार आहे. ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. अपघातामध्ये अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. प्रतिदिन वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. येथील समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनीही यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. वाढते अपघात, नागरिकांची होणारी गैरसोय व वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ६५४ मीटर रुंद, १७.२० मीटर रुंद असा चार मार्गिका असणारा पूल बांधण्यात येणार आहे. उड्डाणपुलाखाली २२ मीटर रुंद व ३.१ मीटर उंच अशा दोन मार्गिका नागरिकांना स्टेशनकडे जाण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर गतिशील योजनेअंतर्गत हे काम करण्यात येणार आहे.
उड्डाणापूल उभारण्याचे काम ज्या ठेकेदारास दिले आहे तो ठेकेदार दिवाळखोरीत गेला आहे. प्रशासनाने याविषयी विधितज्ज्ञांचा अभिप्राय घेतला असता ही निविदा मंजूर करावी किंवा नाही, याबाबत महापालिकेने निर्णय द्यावा, असा अभिप्राय दिला होता. यानंतरही काम संबंधित ठेकेदाराला दिले आहे.
>वाहतूक सुरळीत होणार
ठाणे-बेलापूर रोडवरील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने २००७ मध्येच या रोडचे काँक्रीटीकरण केले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून कोपरखैरणे-घणसोली दरम्यान उड्डाणपूल, सविता केमिकलजवळ उड्डाणपूल, महापे येथे भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने तुर्भेमध्ये उड्डाणपूल बांधल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे.

Web Title: The work of a flyover to a bankruptcy contractor, the proposal approved by the Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.