- वैभव गायकर पनवेल : अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी दिल्यामुळे पनवेल परिसरामधील बहुतांश सरकारी कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले आहे. अपुºया कर्मचाºयांमुळे कामे होत नाहीत. हेलपाटे मारूनही कामे न झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने सुरू आहे. रायगड मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान होत असून मावळ व ठाणे मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिलला होणार आहे. पनवेलमधील महानगरपालिकेसह बहुतांश सर्व सरकारी कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाºयांना निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यालयामधील बहुतांश कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीसमस्या सर्वात गंभीर झाली आहे. अपुºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कचरा व गटारांची समस्याही वाढली आहे. नागरी समस्या सोडविण्यासाठी नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सिडकोसह महापालिकेच्या कार्यालयामध्ये जात आहेत. तेथे जाणाºया नागरिकांना आचारसंहिता सुरू आहे.कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण दिले जात आहे. कामे होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. इतर वेळी नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी नागरी समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात. परंतु राजकीय पदाधिकारीही प्रचारामध्ये व्यस्त असून आचारसंहितेमुळे अनेकांच्या पाठपुराव्याला व आंदोलनाला मर्यादा येत असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत.पनवेलमधील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक, मेट्रो सेंटर व इतर कार्यालयामधील कामकाजही जवळपास ठप्प आहे. कामासाठी गेलेल्या नागरिकांना निवडणूक व आचारसंहिता असल्यामुळे आता कामे होणार नाहीत अशी उत्तरे ऐकायला मिळत आहेत. तहसील व इतर कार्यालयामध्ये इतर वेळी दिवसभर नागरिकांची गर्दी असायची. अधिकारी व कर्मचाºयांना जागेवरून काही वेळ बाजूला जाण्यासही वेळ मिळत नाही अशी परिस्थती असायची. पण सद्यस्थितीमध्ये अनेक कार्यालये ओस पडली आहेत. काही विभागामध्ये एकही कर्मचारी नसल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. निवडणुका होईपर्यंत हीच स्थिती असणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात येत आहे.प्रतिज्ञापत्र करण्याची गैरसोयशासकीय पातळीवर प्रत्येक कामाला सत्य प्रतिज्ञापत्र करणे बंधनकारक असते. तहसील कार्यालयात हे काम चालते. मात्र तहसील कार्यालयात कोणीच उपलब्ध नसल्याने प्रतिज्ञापत्राअभावी अनेकांची कामे अडकली आहेत.निवडणुकीसाठी कर्मचाºयांची आवश्यकता असली तरी त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार नाही व सरकारी कार्यालयामधील कामकाज पूर्णपणे ठप्प होऊ नये अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.कामे होत नसल्याने नाराजीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. यामध्ये पंचायत समिती, महानगर पालिका, सिडको, तहसीलदार, प्रांत, भूमी अभिलेख विभाग, सहायक दुय्यम निबंधक आदी कार्यालये कर्मचाºयांच्या अभावी ओस पडली आहेत. अनेक नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले असून अनेकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.जमीन खरेदी-विक्र ीचे व्यवहार ठप्पपनवेल तालुक्यात सहायक दुय्यम निबंधकांची एकूण पाच कार्यालये आहेत. पाचही कार्यालयांचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने जमीन नावावर करणे, घरे खरेदी-विक्र ी आदी व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या कार्यालयात सध्याच्या घडीला शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.
शासकीय कार्यालयांत कामकाज ठप्प; कर्मचाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:39 AM