रुग्णालयाच्या इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
By नामदेव भोर | Updated: January 28, 2024 19:43 IST2024-01-28T19:43:10+5:302024-01-28T19:43:22+5:30
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या इमारतीवरून दुसऱ्यामजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोषींवर ...

रुग्णालयाच्या इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या इमारतीवरून दुसऱ्यामजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्वराज्य संघटेने केली आहे.
वाशी येथील रुग्णालयामध्ये दुसऱ्या मजल्यावर काम सुरू होते. सकाळी ११ वाजता मुकेश कुमार हा तरूण कामगार खाली पडला. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागेवर मृत्यू झाला. पुढील महिन्यात या तरूणाचे लग्न होते असे बोलले जात आहे. कामगारांना ठेकेदाराने सुरक्षा साधनेही पुरविली नव्हती.
या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. कामगार दुसऱ्या मजल्यावरून कसा पडला. त्याला सुरक्षा साधने का दिली नव्हती. या घटनेला जबाबदार कोण याची चौकशी करावी अशी मागणी स्वराज्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश जुनघरे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत स्वराज्यचे नितीन पावर , प्रशांत मिसाळ, स्वप्निल बेलोशे , विनायक जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.