कामगाराकडून फर्निचर व्यावसायिकाची हत्या

By admin | Published: May 4, 2017 06:15 AM2017-05-04T06:15:12+5:302017-05-04T06:15:12+5:30

धारदार शस्त्राने वार करून फर्निचर व्यावसायिकाच्या हत्येची घटना कोपरखैरणेत घडली आहे. या घटनेनंतर त्याठिकाणचा

The worker killed the worker | कामगाराकडून फर्निचर व्यावसायिकाची हत्या

कामगाराकडून फर्निचर व्यावसायिकाची हत्या

Next

नवी मुंबई : धारदार शस्त्राने वार करून फर्निचर व्यावसायिकाच्या हत्येची घटना कोपरखैरणेत घडली आहे. या घटनेनंतर त्याठिकाणचा कामगार पळालेला असल्याने त्यानेच हत्या केल्याचा संशय असून, दहा दिवसांपूर्वीच तो त्याठिकाणी कामाला लागला होता. यामुळे हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
कोपरखैरणे सेक्टर ९ येथील टिंबर मार्टमधील फर्निचरच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. रामहित शर्मा (३५) हा त्याठिकाणी जुन्या-नव्या फर्निचरच्या साहित्यांची खरेदी-विक्री करायचा. बुधवारी सकाळी त्याचा दुकानात मृतदेह आढळून आला. नेहमीप्रमाणे सकाळी कामावर आलेल्या कारागिराला दुकान बंद दिसले. यामुळे त्याने शटर उघडून पाहिले असता आतमध्ये रामहित शर्मा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. फर्निचरचे धारदार लाकूड अथवा इतर जड वस्तूने डोक्यात घाव घालून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. सदर कामगाराने या घटनेची माहिती रामहितचा मोठा भाऊ रामनिवास यांना व जागा मालकाला दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय तायडे, तसेच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिमंडळ उपआयुक्त प्रशांत खैरे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव
यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेतला.
मंगळवारी रात्री रामहित शर्मा याच्यासोबत त्याचा कामगार एहैतेशामुल हसन (२५) हा दुकानात झोपलेला होता, परंतु घटनेनंतर तो त्याठिकाणावरून पळालेला आहे. मारेकऱ्याने रक्ताने भरलेले कपडे त्याच ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. हे कपडे हसनचे असल्याने त्याने हत्येनंतर कपडे बदलून पळ काढल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. हसन हा दहा दिवसांपासून त्याठिकाणी कामाला लागला होता. यापूर्वी तो ज्या ठिकाणी काम करायचा त्याठिकाणी जादा कामगार झाल्यामुळे रामनिवास यानेच त्याला रामहितकडे नोकरीसाठी पाठवले होते. (प्रतिनिधी)

नशेत केली हत्या
एहैतेशामुल हसनला दारूचे व्यसन असून, फर्निचरसाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिशची देखील तो नशा करायचा. तर दोन दिवसांपासून एका कामगाराकडे दारूची मागणी करत होता. त्याने मंगळवारी रात्री त्याला देशी दारू आणून दिली होती. याच दारूच्या नशेत त्याने रामहित शर्माची हत्या करून पळ काढला.

Web Title: The worker killed the worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.