शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

कामगाराकडून फर्निचर व्यावसायिकाची हत्या

By admin | Published: May 04, 2017 6:15 AM

धारदार शस्त्राने वार करून फर्निचर व्यावसायिकाच्या हत्येची घटना कोपरखैरणेत घडली आहे. या घटनेनंतर त्याठिकाणचा

नवी मुंबई : धारदार शस्त्राने वार करून फर्निचर व्यावसायिकाच्या हत्येची घटना कोपरखैरणेत घडली आहे. या घटनेनंतर त्याठिकाणचा कामगार पळालेला असल्याने त्यानेच हत्या केल्याचा संशय असून, दहा दिवसांपूर्वीच तो त्याठिकाणी कामाला लागला होता. यामुळे हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.कोपरखैरणे सेक्टर ९ येथील टिंबर मार्टमधील फर्निचरच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. रामहित शर्मा (३५) हा त्याठिकाणी जुन्या-नव्या फर्निचरच्या साहित्यांची खरेदी-विक्री करायचा. बुधवारी सकाळी त्याचा दुकानात मृतदेह आढळून आला. नेहमीप्रमाणे सकाळी कामावर आलेल्या कारागिराला दुकान बंद दिसले. यामुळे त्याने शटर उघडून पाहिले असता आतमध्ये रामहित शर्मा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. फर्निचरचे धारदार लाकूड अथवा इतर जड वस्तूने डोक्यात घाव घालून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. सदर कामगाराने या घटनेची माहिती रामहितचा मोठा भाऊ रामनिवास यांना व जागा मालकाला दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय तायडे, तसेच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिमंडळ उपआयुक्त प्रशांत खैरे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेतला.मंगळवारी रात्री रामहित शर्मा याच्यासोबत त्याचा कामगार एहैतेशामुल हसन (२५) हा दुकानात झोपलेला होता, परंतु घटनेनंतर तो त्याठिकाणावरून पळालेला आहे. मारेकऱ्याने रक्ताने भरलेले कपडे त्याच ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. हे कपडे हसनचे असल्याने त्याने हत्येनंतर कपडे बदलून पळ काढल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. हसन हा दहा दिवसांपासून त्याठिकाणी कामाला लागला होता. यापूर्वी तो ज्या ठिकाणी काम करायचा त्याठिकाणी जादा कामगार झाल्यामुळे रामनिवास यानेच त्याला रामहितकडे नोकरीसाठी पाठवले होते. (प्रतिनिधी)नशेत केली हत्याएहैतेशामुल हसनला दारूचे व्यसन असून, फर्निचरसाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिशची देखील तो नशा करायचा. तर दोन दिवसांपासून एका कामगाराकडे दारूची मागणी करत होता. त्याने मंगळवारी रात्री त्याला देशी दारू आणून दिली होती. याच दारूच्या नशेत त्याने रामहित शर्माची हत्या करून पळ काढला.