‘कामगार कायमस्वरुपी कंत्राटीच’

By admin | Published: August 11, 2015 03:30 AM2015-08-11T03:30:35+5:302015-08-11T03:30:35+5:30

विधानसभा निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा अशासकीय ठराव राष्ट्रवादी काँगे्रसने मंजूर करून घेतला होता. परंतु या कामगारांना कायम करता येणार नसल्याचे

'Worker is a permanent contract' | ‘कामगार कायमस्वरुपी कंत्राटीच’

‘कामगार कायमस्वरुपी कंत्राटीच’

Next

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा अशासकीय ठराव राष्ट्रवादी काँगे्रसने मंजूर करून घेतला होता. परंतु या कामगारांना कायम करता येणार नसल्याचे स्पष्ट मत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांचे ठराव फक्त कामगारांना खूश करण्यासाठीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये जवळपास ४८०० कंत्राटी कामगार काम करत आहेत. या कामगारांना महापालिकेने ‘समान कामास समान वेतन’ धोरणाप्रमाणे वेतन देण्यास सुरवात केली आहे. कामगारांना कायम सेवेत घेतले जाणार का याविषयी विचारणा केली असता कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेता येणार नाही असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या एका आदेशाप्रमाणे कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांना कायम करता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
शासनाकडे पाठविला ठराव आयुक्तांनी कंत्राटी कामगारांविषयी वास्तव भूमिका मांडल्यानंतर महापौर सुधाकर सोनावणे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. कामगारांना इतर महापालिकांपेक्षा आपण चांगल्या सुविधा देत आहोत. कामगारांना कायम सेवेत करण्याचा ठराव करून तो शासनाकडे पाठविला आहे. शासनाने यावर निर्णय घ्यायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Worker is a permanent contract'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.