काळ्या फिती लावून कामगारांचे आंदोलन
By Admin | Published: January 24, 2017 06:07 AM2017-01-24T06:07:53+5:302017-01-24T06:07:53+5:30
: कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकरिता सोमवारपासून तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहरातील सर्व विभागातील सफाई
नवी मुंबई : कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकरिता सोमवारपासून तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहरातील सर्व विभागातील सफाई कामगार यात सहभागी झाले असून कामाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
किमान वेतनाबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्याचे खोटे आश्वासन दिल्याची प्रतिक्र ीया यावेळी कामगारांनी व्यक्त केली आहे. आंदोलन काळात कामावर बहिष्कार न टाकता काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. आंदोलनात शहरातील सर्वच विभागांमधील सफाई कामगार सहभागी झाले आहेत. पालिकेच्या ठरावानुसार किमान वेतन तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान वेतन समान काम यापैकी कोणतीही मागणी प्रशासन मान्य करायला तयार होत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराविरु ध्द समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे.