नवी मुंबई : महापालिकेच्या ऐरोली विभागातील उद्यान विभागात पगार वेळेत मिळत नसल्यामुळे ६० ते ७० कंत्राटी कामगारांनी बुधवारी विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.ऐरोली विभागाच्या संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा या कामगारांनी जाहीर निषेध केला. तसेच, ऐरोली विभाग अधिकारी, सहायक उद्यान अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत पालिकेचा देशात ३रा क्रमांक आला. यात या उद्यान विभागाचाही सहभाग आहे. असे असताना ठेकेदार पगार वेळेवर देत नसल्यामुळे कामगारांना वेळेवर घरभाडे देणे शक्य होत नसल्याने घरे खाली करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आमच्या एक महिन्याचा थकीत पगार त्वरित देण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश देऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी या कामगारांनी केली आहे.ऐरोली उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांचा एक महिन्याचा पगार थकीत असल्याची बाब खरी आहे. नवीन कंत्राटदार आल्याने त्या कंत्राटदाराशी त्वरित चर्चा करून कामगारांच्या पगाराचा प्रश्न सोडविला जाईल.- प्रशांत उरणकर, सहायक उद्यान अधिकारी, ऐरोली.
पगार न मिळाल्याने कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:31 PM