पगारासाठी सफाई कामगारांचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:11 AM2019-01-25T00:11:49+5:302019-01-25T00:11:59+5:30
पगार न झाल्याने पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी पगार न झाल्याने गुरुवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
पनवेल : पगार न झाल्याने पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी पगार न झाल्याने गुरुवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. भारिप बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात सुमारे २० पेक्षा जास्त सफाई कामगार सहभागी झाले होते. यावेळी कामगारांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.
महापालिकेच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदाराची नियुक्ती केलेली आहे. या ठेकेदारामार्फत पालिका क्षेत्रातील कचरा उचलला जातो. मात्र, महिना उलटूनही पगार न दिल्याने अनेक दिवसांपासून सफाई कर्मचारी पालिका प्रशासनाकडे पगार अदा करण्याची मागणी करीत होते. भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कामगारांच्या खात्यात पगार जमा करण्याच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या आश्वासनानतर आंदोलन मागे घेतले.