कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा 

By नामदेव मोरे | Published: September 25, 2023 12:48 PM2023-09-25T12:48:31+5:302023-09-25T12:48:39+5:30

काही माथाडी नेतेच ठेकेदार झाले आहेत. काही नेत्यांनी माथाडी कामगार कायदा बदनाम केला असल्याची टीका ही नरेंद्र पाटील यांनी केली.

Workers will protest against the Minister; Narendra Patil's warning | कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा 

कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा 

googlenewsNext

नवी मुंबई: कामगार मंत्री सुरेश खाडे कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत.  ते प्रश्न सोडविले नाहीत तर त्यांच्या विरोधात मोर्चा काढणार असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे संस्थापक अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात नरेंद्र पाटील बोलत होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी कामगार मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली. कामगार मंत्री माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत.  कामगार कायदा संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री, उद्योग मंत्री कामगार मंत्री म्हणतात माथाडी कामगारांमध्ये चुकीचे काम करणारे खंडणी गोळा करणारे तयार झाले आहेत.  कोण असे करत असेल त्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. काही माथाडी नेतेच ठेकेदार झाले आहेत.  काही नेत्यांनी माथाडी कामगार कायदा बदनाम केला असल्याची टीका ही नरेंद्र पाटील यांनी केली.

Web Title: Workers will protest against the Minister; Narendra Patil's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.