पनवेलमध्ये जागतिक नेत्रदान पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:54 AM2017-08-05T02:54:09+5:302017-08-05T02:54:09+5:30
नेत्रदानाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याकरिता पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीने २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कळंबोली : नेत्रदानाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याकरिता पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या वतीने २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दहा रोटरी क्लब तसेच विविध सामाजिक संस्था सहभाग नोंदवणार आहेत. लोकमत या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
सृष्टीची जाणीव करून देणारा एकमेव अवयव म्हणजे ‘नेत्र’. दृष्टीच नसेल तर हे जग पाहता येत नाही. भारतात जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टिहीन आहेत. साधारण दृष्टिदोषाने २७ दशलक्ष व्यक्ती ग्रासले आहेत. दोन्ही डोळ्यांचे अंधत्व ९ दशलक्ष लोकांना असून ३ दशलक्ष बालके अंध आहेत. बाहुलीचा पडदा खराब असणाºया अंध व्यक्तींची संख्या ४.६० दशलक्ष आहेत. मात्र मृत्यूपश्च्यात नेत्रदानाने यातील काहींच्या अंधत्वावर आपण मात करू शकतो, यासाठी लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटकडून जनजागृती करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अभिषेक होशिंग यांनी दिली. यानिमित्ताने पनवेल परिसरातील रुग्णालयांत जनजागृती करण्यात येणार आहे.
नवी मुंबई, पनवेल परिसरातील गणेशोत्सव मंडळांना भेटी देवून त्यांना नेत्रदानाविषयी माहिती दिली जाणार आहे. मंडळातील पदाधिकाºयांना जनजागृती करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ११ या दरम्यान आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्र माच्या माध्यमातून नेत्रविषयक जागृती केली जाणार आहे.