नवी मुंबईत रिले गाण्याचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:43 AM2017-08-18T05:43:23+5:302017-08-18T05:43:33+5:30
राज्यभरातील ३२७ गायकांनी रिले पद्धतीने गाणे गाऊन ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला आहे.
नवी मुंबई : राज्यभरातील ३२७ गायकांनी रिले पद्धतीने गाणे गाऊन ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर आधारित चित्रपटातील हे गाणे आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व डॉ. लहाने यांच्या उपस्थितीत ‘गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र देण्यात आले.
गायक विराग वानखेडे यांनी
या रेकॉर्डकरिता राज्यभरातून ३२७ महिला व पुरुष गायकांची निवड केली होती. त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्तींसह कोल्हापूरचे आमदार सुजित मंचेकर हेही सहभागी झाले होते. या सर्वांनी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बुधवारी रात्री डॉ. लहाने
यांच्यावर रचलेल्या ‘काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू’ हे गाणे खंड न पडू देता, रिले पद्धतीने
गायले. या गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याची घोषणा गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे परीक्षक स्वप्निल डांगरीकर यांनी केली. या कार्यक्रमासाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते. यापूर्वी २९६ जणांनी रिले पद्धतीने गायन केल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होता.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे, महापौर सुधाकर सोनवणे, डॉ.
विठ्ठल लहाने, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.