नाट्यगृहात चुकीचा नामफलक

By admin | Published: January 22, 2017 03:16 AM2017-01-22T03:16:55+5:302017-01-22T03:16:55+5:30

पनवेल महापालिका अस्तित्वात येऊन १०० दिवस पूर्ण झाले तरी अनेक ठिकाणी नगरपरिषदेच्या नावाचा उल्लेख आढळतो. महापालिकेच्या नाट्यगृहातील रंगमंचावरील

Wrong nomination in the theater | नाट्यगृहात चुकीचा नामफलक

नाट्यगृहात चुकीचा नामफलक

Next

पनवेल : पनवेल महापालिका अस्तित्वात येऊन १०० दिवस पूर्ण झाले तरी अनेक ठिकाणी नगरपरिषदेच्या नावाचा उल्लेख आढळतो. महापालिकेच्या नाट्यगृहातील रंगमंचावरील आद्य क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल नगरपरिषद या नावात अद्याप बदल करण्यात आलेला नाही, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पनवेल महापालिका १ आॅक्टोबर, २०१६ पासून अस्तित्त्वात आली. डॉ. सुधाकर शिंदे यांची महापालिकेचे पहिले आयुक्त म्हणून नेमणूक झाली. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यावर अनेक बदल घडवून आणले. या वेळी नगरपरिषदेच्या इमारतीवर पनवेल महानगरपालिका फलक लावण्यात आला. शहरातील अनधिकृत बांधकामे, बेकायदा बॅनरबाजी हटविण्यात आली. त्यामुळे रस्ते, पदपथांनी मोकळा श्वास घेतला; पण पनवेल महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील रंगमंचावरील पनवेल नगरपरिषद हा फलक अद्याप बदलण्यात आलेला नाही.
नाट्यगृहाला दर महिन्याला हजारो प्रेक्षक भेट देतात. या वेळी रंगमंचावर असलेल्या पनवेल नगरपरिषदेचे नाव बदलून पनवेल शहर महानगरपालिका करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

Web Title: Wrong nomination in the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.