बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 09:52 AM2021-12-31T09:52:40+5:302021-12-31T09:53:22+5:30

ओमायक्रॉन  कोरोना संसर्ग होत असल्याने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. 

You can get a mask for ten rupees in the market, but you can't buy it ..! | बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..! 

बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..! 

Next

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेल परिसरात कोरोना संसर्ग ओसरल्याने बिनधास्त झालेल्या नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळे सॅनिटायझर आणि मास्कची विक्री काही प्रमाणात मंदावल्याचे औषध विक्रेत्याने सांगितले.  कोरोनाची लस घेतल्याले, आपण कोरोनामुक्त झालोय, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. मात्र  ओमायक्रॉन  कोरोना संसर्ग होत असल्याने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. 

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना संख्या कमी झाल्यामुळे तसेच राज्यातील कोरोना संसर्ग ओसरल्यामुळे कोरोना नियमात शिथिलता देण्यात आली होती. त्यानुसार  प्रवास, कार्यक्रम, लग्न समारंभासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेले नागरिक बिनधास्त वावरताना दिसून येत आहेत. सद्य स्थितीत ओमायक्रॉन संसर्गाचे  रुग्ण वाढल्याने कोरोना  नियम कडक करण्यात आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात परदेश वारीतील  ६ ओमायक्रॉनबाधित आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यानुसार मास्कचा वापर, कार्यक्रमावर नजर ठेवण्यात येत आहे, तर पालिकेने ‘नो मास्क, नो एंट्री’ धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे न संपल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर, वारंवार सॅनिटायझर लावणे, हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या गोष्टी गरजेच्या आहेत. मात्र नागरिकांकडून           याकडे दुर्लक्ष होत आहे.                       पालिकेकडून  कारवाई करण्यात येत असली, तरी नागरिकांचा निष्काळजीपणा समोर येत आहे.  

मास्क लावणे गरजेचे…
प्रशासनाने पनवेल परिसरात मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली असली तरी, मास्क न घालता फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही संसर्ग होऊ नये याकरिता मास्क वापरणे गरजेचे आहे. कोराेनाच नव्हे, तर इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त आहे. 
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. याने कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.

मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत घट
    पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान बहुतांश नागरिकांच्या हातात किंवा खिशात सातत्याने सॅनिटायझरची बाटली अथवा स्प्रे ठेवणाऱ्या नागरिकांनी सॅनिटायझर वापरणे आता कमी केले आहे.  
    मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती कमी झाल्या आहेत. तरी नागरिक या  वस्तूंची खरेदी कमी करत असल्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत विक्रीत घट झाल्याचे अनिल रूपकर या औषध विक्रत्याने सांगितले.

Web Title: You can get a mask for ten rupees in the market, but you can't buy it ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.