सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणाला प्राण गमवावे लागल्याची घटना कोपरखैरणेत घडली. असह्य वेदनेने तो ओरडत असताना त्याला कोरोना झाल्याच्या संशयामुळे कोणीही मदतीसाठी आले नाही. त्याचवेळी रुग्णवाहिका येण्यासाठीही पाच तास लागल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला.कोपरखैरणे सेक्टर ३ येथे राहणाऱ्या तरुणाची प्रकृती सोमवारी रात्री खालावली. ग्राफिक डिझायनर असलेला तो तरुण येथे भाड्याने घेतलेल्या घरात राहात होता. त्याची पत्नी गावी असून दोन महिन्यांपासून तो घरूनच काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी हृदयाशी संबंधित आजारामुळे त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. तीन ते चार दिवसांपासून तो पुन्हा आजारी होता. सोमवारी रात्री १०च्या सुमारास घरात एकटाच असताना वेदनेने ओरडू लागला. तसेच आपल्याला त्रास होत असल्याचे त्याने घरमालकाला फोन करून सांगितले. यामुळे घरमालकाने पोलिसांना तसेच रुग्णालयात कळवले. त्याला खोकला येत असल्याने कोरोना झाल्याचा संशय परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला. त्यामुळे इतर वाहनांतून त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. सुमारे दीड तासाने एक रुग्णवाहिका आली; परंतु ती छोटी असल्याने व त्यात पीपीई किट नसल्याने ती परत गेली.अखेर पहाटे तीनच्या सुमारास पालिकेची रुग्णवाहिका आली. त्यासाठीही उपस्थित पोलिसांना प्रयत्न करावे लागले. रुग्णवाहिका पाठवताना चालकांव्यतिरिक्तकोणी मदतीसाठी नसल्याचे सांगितले. सोबत पाठवलेले पीपीई किट घालून रुग्णाला रुग्णवाहिकेत बसवण्यास पोलिसांनाच सांगितले. रुग्णवाहिका आल्यावर पोलिसांनी मदतीला काही व्यक्तींना घेऊन तरुणाला घराबाहेर काढले. त्यावेळी तो मृत असल्याचे लक्षात आले. प्रथम हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवल्याचे समोर आले. वैद्यकीय अहवालानंतर त्याचा मृत्यू कशामुळे झाला, त्याला कोरोना होता का? या बाबी उघड होतील.>घरमालकानेच कळवलेतरुणाला एक वर्षाची मुलगी असून पत्नी व मुलगी सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर पत्नी व मुलीच्या भेटीसाठी जाणार होता. सोमवारी रात्री ८ वाजल्यापासूनच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे घरमालकाने मुंबईत राहणाºया त्याच्या नातेवाइकांना कळविले होते. परंतु रात्री १० वाजेपर्यंत कोणीही न आल्याने घरमालक शिवशंकर गुप्ता यांनी पोलीस व रुग्णवाहिकेसाठी कळवले होते.
CoronaVirus: कोपरखैरणेत मदतीच्या प्रतीक्षेत तरुणाने सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 6:26 AM