शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

माणुसकीच्या भिंतीआडून काढतायेत तरुणींची छेड

By सूर्यकांत वाघमारे | Published: December 11, 2023 5:55 PM

"नको ते द्या आणि हवे ते घ्या" या उद्देशाने महापालिकेने शहरात ठिकठिकाणी माणुसकीच्या भिंतीचे शेड उभारले आहेत.

नवी मुंबई : गरजूंच्या सोयीसाठी महापालिकेने उभारलेली माणुसकीची भिंतच मुलींची छेड काढण्यासाठी वापरली जाऊ लागली आहे. कोपर खैरणेत महाविद्यालयाला लागूनच पदपथावर असलेल्या माणुसकीच्या भिंतीवर जाणीवपूर्वक महिला व पुरुषांचे अंतर्वस्त्र लटकवले जात आहेत. हा प्रकार विद्यार्थिनींना लज्जास्पद वाटत असून तिथून चालताना कुचंबणा होत आहे. 

"नको ते द्या आणि हवे ते घ्या" या उद्देशाने महापालिकेने शहरात ठिकठिकाणी माणुसकीच्या भिंतीचे शेड उभारले आहेत. अनेक ठिकाणी हे शेड गरजूंना उपयुक्त ठरत आहेत. तर काही ठिकाणी हे शेड कचरा कुंडी प्रमाणे वापरले जात आहेत. तर काही ठिकाणी माणुसकीच्या भिंतीची जागा चुकल्याने ते वापराविना पडून आहेत. अशाच प्रकारे कोपर खैरणे येथे रा.फ. नाईक विद्यालय व एफ. जी. नाईक महाविद्यालयाला लागूनच पदपथावर माणुसकीच्या भिंतीचे शेड उभारण्यात आले आहे. यामुळे पदपथावर चालणाऱ्यांना अडचण होत असून शेडच्या खालीच कचरा साचला आहे. 

अशातच या माणुसकीच्या भिंतीच्या आडून महाविद्यालयीन तरुणींची छेड काढण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून त्याठिकाणी पदपथावर महिला, पुरुषांचे अंतर्वस्त्र टाकले जात आहेत. तसेच शेडमध्ये देखील ते लटकवले जात आहेत. यामुळे तिथून ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींच्या मनात लज्जा निर्माण होऊन त्यांची कुचंबणा होत आहे. याबाबत अनेकींनी शिक्षिकांकडे त्यांची होणारी कुचंबणा बोलून देखील दाखवली आहार.  

यामुळे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी तिथले शेड इतरत्र हलवावे यासंदर्भात अनेकदा महापालिका अधिकाऱ्यांना कळवले आहे. परंतु स्वच्छता अभियानाच्या नावाखाली दिखाव्याला उभारलेले हे शेड तिथून हटवण्यात व मुलींची काढली जाणारी छेड थांबवण्यात प्रशासन उदासीनता दाखवत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई