एमटीव्ही शोमधील स्पर्धक दानिश जेहनचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 16:07 IST2018-12-20T16:04:24+5:302018-12-20T16:07:14+5:30
एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

एमटीव्ही शोमधील स्पर्धक दानिश जेहनचा अपघाती मृत्यू
मुंबई - लोकप्रिय यूट्यूब आणि एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमधील स्पर्धक दानिश जेहन (वय 21) याचा वाशी येथे कार अपघातात मृत्यू झाला आहे. दानिश जेहन आज सकाळी एका लग्न समारंभावरून घराच्या दिशेने प्रवास करत होता. त्यावेळी वाशी येथे त्याची कारला अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी दानिशची हेअरस्टाईल सोशल मीडियावर वायरल झाली होती. हॉलीवूडचा पॉ़पस्टार जस्टीन बीबरसारखी हेअरस्टाईल दानिशने केली होती. त्याचा तो हटके लूक चाहत्यांना आवडला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला दानिश जेहन त्याच्या व्हिडीओ व ब्लॉग्जमुळे अल्पावधीतच प्रकाशझोतात आला होता. एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.