‘जिल्हा परिषद, महापालिका जिंकणारच’
By admin | Published: January 13, 2017 06:20 AM2017-01-13T06:20:53+5:302017-01-13T06:20:53+5:30
विकासावर भर देणे व भूमिपुत्रांचे स्थलांतर थांबविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून
पनवेल : विकासावर भर देणे व भूमिपुत्रांचे स्थलांतर थांबविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच प्रयत्न सुरू आहेत, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरीपुरवठा, बंदरे, ग्राहक संरक्षण व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल येथे केली.
काँग्रेसचे नंदराज मुंगाजी व जिल्हा परिषद सदस्या भारती मुंगाजी यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. बुधवारी पनवेल मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकापचे शिरढोण ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश वाकडीकर, गव्हाण येथील शेकापचे ज्येष्ठ नेते रघुनाथ घरत यांचे चिरंजीव अशोक घरत यांच्यासह तारा, बारापाडा, केळवणे, गणेशपुरी या गावांतील तसेच पनवेल शहरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. चव्हाण म्हणाले, ‘जलयुक्त शिवार’ योजनेमुळे १,१५,००० गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. १६१ योजनांचा लाभ थेट लाभार्थींना होत आहे. सेवा हमी कायद्यासारखा लोकाभिमुख ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाने नेहमीच सर्वसामान्यांचा विचार केला आहे. कार्यकर्त्यांच्या विश्वासावर जिल्हा परिषद, पंचायत समिती व पनवेल महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार