जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना तीन महिने नाहीत पगार
By admin | Published: May 22, 2017 03:46 AM2017-05-22T03:46:27+5:302017-05-22T03:46:27+5:30
पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या आठ तालुक्यांतील बांधकाम, पाणीपुरवठा व पशुसंवर्धन विभागातील पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून झालेले नाहीत
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या आठ तालुक्यांतील बांधकाम, पाणीपुरवठा व पशुसंवर्धन विभागातील पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून झालेले नाहीत. त्यामुळे ऐन लग्नसराईत व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत त्यांच्यावर उसनवारीची वेळ आली आहे.
काही कर्मचाऱ्यांच्या मुला, मुलींची लग्न आहेत, तर अनेक कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडे लग्नसोहळे आहेत. पगाराअभावी मुला-मुलींचे विवाह सोहळे पुढे ढकलण्याची वेळ काहींवर आली आहे, तर काहींवर नातेवाईकांना लग्न कार्यात अर्थिक मदत करता न आल्याने, त्यांचा रोष ओढवून घेण्याची वेळ आली आहे.