Numerology and Career : एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीत संख्या महत्वाची भूमिका बजावते. तुमची जन्म तारीख किंवा भाग्यांकाच्या अनुरूप करिअर निवडणे, तुम्हाला करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करेल. अंकशास्त्रानुसार सुसंगत नसलेले करिअर निवडणे तुम्हाला तितकसं यश मिळवून देणार नाही.
भाग्यांक : भाग्यांकाचा अर्थ आहे तुमची जन्म तारीख. जर तुमचा जन्म १४ तारखेला तुमचा भाग्यांक १+४ म्हणजेच ५ असतो.
मूलांक : मूलांक म्हणजे तुमच्या संपूर्ण तारखेची एक अंकी बेरीज असते. जर तुमची जन्मतारीख १४.०४.२००१ असेल तर या संख्यांची एकूण बेरीज ३ येते. त्यामुळे तुमचा मूलांक हा ३ होतो.
विशिष्ट अंक (मास्टर नंबर्स) : जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ११ किंवा २२ तारखेला झाला असेल तर त्या संख्येचे एकल-अंकी संख्येत रूपांतर करू नका. ११ आणि २२ हे विशिष्ट अंक आहेत, ज्यात काही अतिरिक्त आणि उत्तम गुण असल्याचं सांगितलं जातं. जर तुमचा जन्म २९ तारखेला झाला असेल तर तो अंक जोडा आणि तो ११ हा विशिष्ट अंक होईल. डॉ. मधू कोटीया यांनी अंशास्त्रानुसार काही करिअर्सचे प्रकार कसे असतील याबद्दल सांगितलं आहे.
मूलांक १ - ज्या व्यक्तींचा मूलांक एक असतो त्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण अधिक दिसून येतात. अशा व्यक्ती सामान्यत: स्वतंत्र करिअर निवडतात. अशा व्यक्तींसाठी सीईओ, लष्करी अधिकारी, राजकारणी यांमध्ये करिअर करणे अधिक उपयुक्त किंवा प्रगतीकारक ठरू शकते असं सांगितलं जातं.
मूलांक २ - ज्यांचा मूलांक २ असतो अशा व्यक्ती सर्जनशील, मृदूभाषी असतात. अशा व्यक्तींनी डिझायनर, कला, साहित्य अशा क्षेत्रांची निवड करणं यशकारक मानलं जातं. तसंच या व्यक्ती चांगल्या मध्यस्थ, कॉन्सिलर्स, पीआर, सेल्स अशा क्षेत्रात आपलं नशीब आजमावू शकतात, असं म्हटलं जातं.
मूलांक ३ - ज्यांचा मूलांक ३ असतो त्या व्यक्ती मैत्री जपणारे, आनंदी आणि सदैव मदतीस तत्पर असणारे असतात. ते समोरच्या व्यक्तीचं मनोरंजनही चांगल्या पद्धतीनं करू शकतात. त्यामुळे त्यांनी अभिनय, संगीत, स्टँड अप कॉमेडी अशा क्षेत्रात जाणं यश व प्रगतीकारक ठरू शकतं. या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुणही मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यानं त्यांना लष्करी अधिकारी, वकिल, जनसंपर्क, शिक्षक, प्रशिक्षक अशा क्षेत्रात करिअर करण्याची संधी असते, असं म्हटलं जातं.
मूलांक ४ - ज्या व्यक्तींचा मूलांक चार आहे अशा व्यक्ती बहुगुणसंपन्न असतात,असं म्हटलं जातं. केवळ आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर या व्यक्ती यशोशिखर गाठतात. अशा व्यक्ती टीकाकार, विचारवंत, असं गुण असलेले असतात. या व्यक्तींसाठी पत्रकारिता, वकिली, तंत्रज्ञ, तंत्रज्ञान या मध्ये करिअर करणं उत्तम मानलं जातं. परंतु जुगार किंवा शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावू नये असं म्हटलं जातं.
मूलांक ५ - ज्या व्यक्तींचा मूलांक ५ आहे, त्या स्मार्ट काम करणारे, बहु-प्रतिभाशाली असे असतात, असं म्हटलं जातं. अशा व्यक्तींनी अभिनय, संगीत, पत्रकारिता, वकिली, कायदा, चित्रपट निर्मिती, विक्री आणि विपणन, जनसंपर्क, डिटेक्टिव्ह एजन्ट अशा क्षेत्रात करिअर करणे यश व प्रगतीकारक मानले जाते. अशा व्यक्तींनी शेअर मार्केटसारख्या जोखीम असलेल्या क्षेत्रात जाऊ नये अन्यथा मोठा फटका बसू शकतो असे सांगितले जाते.
मूलांक ६ - ज्यांचा मूलांक ६ आहे त्या व्यक्ती अतिशय जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. कुटुंब, मित्रमंडळी आणि समजात त्यांना सन्मानाचं स्थान प्राप्त होतं. अशा व्यक्तींनी आर्किटेक्ट, फॅशन डिझायनर, इंटिरिअर डिझायनर, डॉक्टर, विपणन, जनसंपर्क, तसंच हॉटेल्स, खाद्यप्रक्रिया उद्योग, शेती अशा क्षेत्रात करिअर करणं उत्तम मानलं जातं.
मूलांक ७ - ज्या व्यक्तींचा मूलांक ७ आहे, अशा व्यक्ती धार्मिक, गंभीर आणि अतिशय मेहनती अशा असतात. त्यांची निरिक्षण शक्ती अतिशय उत्तम असते. ते अतिशय उत्तम विचारवंत, विश्लेषक असतात. या व्यक्ती आपल्याकडील गोपनीय माहिती उघड करत नाही. अशा व्यक्तींनी संशोधक, लेखक, शिक्षक, प्रशिक्षक यांसह विज्ञान धर्म आणि अध्यात्माशी संबंधित करिअर करू शकतात.
मूलांक ८ - ज्या व्यक्तींचा मूलांक ८ आहे अशा व्यक्तींनी प्रशासन, व्यवस्थापन, आर्थिक क्षेत्रात जाणं, तसंच एनजीओ, रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रातही आपलं नशीब आजमाऊ शकतात असं म्हटलं जातं.
मूलांक ९ - ज्या व्यक्तींचा मूलांक ९ आहे अशा व्यक्तींना संघर्षातून पुढे जाणं उत्तमरित्या जमतं. अशा व्यक्तींनी लष्कर, नौदल, पोलीस, हवाईदल अशा क्षेत्रात आपलं नशीब आजमावं असं म्हटलं जातं. ते बांधकाम व्यवसाय, खाणकाम अशा क्षेत्रातही आजमावू शकतात असं म्हटलं जातं.
विशिष्ट ११,२२,३३,४४ अंक असलेल्या व्यक्तीविशिष्ट अंक ११ - विशिष्ट अंक ११ हा अध्यात्माशी निगडीत असलेला अंक आहे. या व्यक्ती धार्मिक आणि अध्यात्माशी निगडीत असलेल्या क्षेत्रात आपलं करिअर करू शकतात. तसंच अशा व्यक्तींनी डिझायनर, कला, साहित्य अशा क्षेत्रांची निवड करणं यशकारक मानलं जातं. तसंच या व्यक्ती चांगल्या मध्यस्थ, कॉन्सिलर्स, पीआर, सेल्स अशा क्षेत्रात आपलं नशीब आजमावू शकतात, असं म्हटलं जातं.
विशिष्ट अंक २२- ज्या व्यक्तींचा विशिष्ट अंक २२ आहे त्या व्यक्ती आपण निवडलेल्या क्षेत्रात अविश्वसनीय कार्य करतात. अशा व्यक्तींसाठी मूलांक ४ आणि मूलांक ८ यांप्रमाणे करिअर निवडू शकतात, असं सांगितलं जातं. याशिवाय ते शिक्षणतज्ज्ञ, योद्धे, राजकारणी आणि उद्योजक बनू शकतात, असंही म्हटलं जातं. हा अंक उत्तम मानला जातो.
विशिष्ट अंक ३३ - विशिष्ट अंक ३३ असणाऱ्या व्यक्ती उत्तम कलाकार (सादरकर्ते) असू शकतात. तसेच या व्यक्तींसाठी मूलांक ३ आणि मूलांक ६ यामध्ये दिलेले करिअरचे पर्याय शुभ ठरू शकतात, असंही सांगण्यात येतं.
विशिष्ट अंक ४४ - विशिष्ट अंक २२ प्रमाणेच विशिष्ट अंक ४४ हा देखील उत्तम मानला जातो. अशा व्यक्ती जीवनात खुप यशस्वी होतात. अशा व्यक्तींनी निवडलेल्या क्षेत्रात ते उच्च अधिकारपदी पोहोचतात. या व्यक्तींसाठी मूलांक ४ आणि मूलाक ८ साठी देण्यात आलेले करिअरचे पर्याय उत्तम ठरू शकतात, असं म्हटलं जातं.