इंग्रजी वर्षाची सुरुवात जानेवारीत होते आणि त्या वर्षातील महिन्यानुसार आपलेही वाढदिवस आपण साजरे करतो. वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारीत ज्यांचे वाढदिवस असतात, त्यांची नवीन वर्षाची तसेच वयाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात वर्षारंभीच होते. या महिन्यात जन्माला आलेले लोक कसे असतात, ते जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारीत जन्माला आलेले लोक आकर्षक आणि व्यवहाराला पक्के असतात. ते आपले भाग्य स्वत: निर्माण करतात. त्यांच्या मेहनतीला नशीबाची उत्तम साथ लाभते. तसे असले, तरीदेखील ते आपल्या व्यक्तीमत्त्वाची संवेदनशील बाजू सहसा कोणाला दाखवत नाहीत.
कामात चोख आणि कुशाग्र बुद्धी यांचा ताळमेळ त्यांच्याठायी दिसून येतो. एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्ण करेपर्यंत थांबत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर संस्कारांचीही समोरच्यावर छाप पडते. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत असतात. खुद्द देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्याने ते अभ्यासात हुशार असतात.
व्यक्तीमत्त्वाची जमेची बाजू म्हणजे लाघवी आणि मृदू भाषा. याबाबतीत त्यांची संवादावर पकड असल्याने अनेक लोक जोडले जातात. त्यांना पसारा आवडत नाही. आवराआवर करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो.
मात्र, हे लोक समोरच्याचे ऐकून घेण्याआधी बोलून मोकळे होतात. कोणावरही चटकन विश्वास ठेवतात. अर्थात हलक्या कानाचे असतात. जर सगळे काही तुमच्या मनासारखे झाले, तरच तुम्ही सौजन्याने वागता, अन्यथा संयम गमावून बसता. दुसऱ्यांच्या वेळेची किंमत करत नाहीत. या गोष्टी स्वभावाचा एक भाग आहेत. परंतु, त्या वगळता तुम्ही कोणाशी फार काळ वैर ठेवत नाही.
जानेवारीत जन्माला आलेली मुले प्रेमाच्या बाबतीत काही प्रमाणात कमनशिबी असतात. चुकीचे निर्णय घेऊन फसतात. तर, मुली प्रेमात नशीब काढतात. मुलींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे जोडीदार भाग्यवान ठरतात.
या महिन्यात जन्माला आलेले लोक इलेक्ट्रॉनिक मीडिया, सैन्यदल, चार्टर्ड अकाऊंट, अध्यापन क्षेत्रात रस घेतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमताही जास्त असते.
या महिन्यात जन्मलेल्या लोकांनी केवळ आपलेच म्हणणे खरे न करता, लोकांचेही ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या दृष्टीकोनातूनही जगाकडे पाहिले पाहिजे. लोकांचा मान ठेवला पाहिजे. तसे केल्यास त्यांना नशीबाची, कतृत्त्वाची आणि समाजाची योग्य साथ लाभेल.