रियो डी जेनेरो : जगातील सर्वांत वयस्क स्काई डाइव्हरचा गौरव मिळविल्याच्या तीन वर्षांनंतर १0६ वर्षीय ऐडा जेमान्क्यू आॅलिम्पिक मशाल हाती घेणारी सर्वांत वयस्क व्यक्ती बनली आहे.जेमान्क्यूने अॅलेक्झांडर काप्तारेंकोचा विक्रम मोडला होता. अॅलेक्झांडर याने २0१४ च्या सोची हिवाळी आॅलिम्पिक मशाल रिलेत सहभाग नोंदवला होता. तेव्हा त्यांचे वय १0१ होते. जेमान्क्यूने अमेजेनेयाचे शहर मकापात आॅलिम्पिक मशाल हाती घेतली. जेमान्क्यू म्हणाल्या, ‘‘मी खूप आनंदित आहे, यासाठी आभारीदेखील आहे. मी याची कल्पनादेखील केली नव्हती. मी खूप गौरवान्वित झाली आहे.’’ आॅलिम्पिक मशालीचा हा प्रवास ९५ दिवसांचा आहे. ही मशाल ब्राझीलच्या ३२५ शहरांतून जाणार आहे. मशालीचा प्रवास ५ आॅगस्ट रोजी रियोच्या माराकाना स्टेडियममध्ये संपणार आहे. यादरम्यान जवळपास १२ हजार धावपटू सहभागी होतील.
आॅलिम्पिक मशाल १0६ वर्षीय महिलेच्या हाती
By admin | Published: June 21, 2016 2:06 AM