शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 1:29 PM

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ ची तारीख जाहीर झाली.  

Commonwealth Games 2026 News In Marathi : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. मात्र, या नामांकित स्पर्धेतून क्रिकेट, हॉकीसह तब्बल तेरा खेळ वगळण्यात आले आहेत. भारताचे वर्चस्व असलेले प्रमुख खेळ आगामी स्पर्धेत नसल्याने भारताला मोठा झटका बसला आहे. खरे तर ही स्पर्धा नक्की कुठे खेळवली जाणार याची मागील काळात बरीच चर्चा रंगली होती. अखेर स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा खेळवली जाईल हे निश्चित झाले. २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा पार पडेल. आर्थिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाने यजमानपद नाकारले होते. 

हॉकी, क्रिकेट, कुस्ती, शूटिंग आणि बॅडमिंटन हे खेळ आगामी स्पर्धेत नसतील. नियोजित वेळापत्रकानुसार ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियात ही स्पर्धा होणार होती. मात्र, व्हिक्टोरियाने यजमानपद न स्वीकारल्याने काही खेळ वगळण्यात आले. त्यामुळे भारतीय चाहते आता थेट आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकच्या प्रतीक्षेत असतील असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. आगामी स्पर्धेतून एकूण १३ खेळ वगळले असून, यामध्ये भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीचादेखील समावेश आहे. तसेच हॉकी, रग्बी सेवन, डायविंग, बॅडमिंटन, बीच वॉलीबॉल, रोड सायकलिंग, माउंटेनबाइकिंग, रिदमिग जिमनास्टिक, स्क्वॅश, टेबल टेनिस, ट्रायथलॉन, कुस्ती आदी खेळ वगळण्यात आले आहेत. 

भारताच्या मेडल आशांना धक्का राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नेहमीच भारतीय शिलेदारांनी चमक दाखवली आहे. हॉकी, क्रिकेट, कुस्ती आणि बॅडमिंटनसारख्या खेळांनी भारताच्या पदकांची झोळी भरण्यात मोठे योगदान दिले. पण, २०२६ च्या स्पर्धेतून या खेळांना वगळल्याने भारताच्या आशा मावळल्याचे दिसते. भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ पदकाचा प्रबळ दावेदार असतो. मागील स्पर्धेत पुरुष संघाने रौप्य पदकाची कमाई केली होती. तर बॅटमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने पदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये क्रिकेटने पदार्पण केले. पदार्पणाच्या हंगामातच भारताच्या महिला क्रिकेट संघाने रौप्य पदक जिंकले. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?सुरुवातीला व्हिक्टोरियाला २०२६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे अधिकार देण्यात आले होते. पण, आर्थिक कारणामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. स्पर्धेचे बजेट वाढल्याने तेथील सरकारला माघार घ्यावी लागली. स्कॉटलंडने २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते. कमी खर्चात स्पर्धा पार पडावी या उद्देशाने त्यांनी २०२६ च्या स्पर्धेतून काही प्रमुख खेळ वगळले. विशेष बाब म्हणजे सुधारित आवृत्तीमध्ये फक्त १० खेळांचा समावेश असेल. यामध्ये थलेटिक्स, पोहणे, बॉक्सिंग आणि सायकलिंगचा समावेश आहे. अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांचे लक्ष आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकसारख्या इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे वळू शकते.

टॅग्स :IndiaभारतHockeyहॉकीBadmintonBadmintonWrestlingकुस्ती