१९७९ च्या विश्वचषकाचे यजमानपद मिळवण्यासाठी भारत इच्छूक होता. पण १९७५ मधील विश्वचषकाचे उत्कृष्ट आयोजन करणा-या इंग्लंडला सलग दुस-यांदा विश्वचषकाचे आयोजन करण्याचा मान मिळाला.
दुस-या विश्वचषकात कसोटी खेळणारे नेहमीचे सहा देशांसोबत कॅनडा, श्रीलंका या दोन देशांनाही स्थान देण्यात आले. विश्वचषकाचा फॉर्मेट १९७५ प्रमाणेच ठेवण्यात आला होता. ९ ते २३ जून १९७९ या कालावधीत दुसरे विश्वचषक रंगले. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने सर व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या शतकाच्या आधारे यजमान इंग्लंडला क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्ड्स मैदानावरच ९२ धावांनी पराभूत विश्वविजेतेपद कायम राखले.
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - १५
एकूण धावा - ६, १६२
एकूण विकेट्स - २०८
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - जॉर्डन ग्रिनीज - वेस्ट इंडिज (चार सामन्यांमध्ये २५३ धावा)