एआयएफएफचा निर्णय : गोवा एफसीविरुद्ध तणावपूर्ण सामन्यात खेळाडूंबरोबर वाद
नवी दिल्ली : अ. भा. फुटबॉल महासंघाने शनिवारी शिस्तभंगाची कारवाई करीत आयएसएल लीगमध्ये खेळणा:या अॅटलेटिको डी कोलकाता संघाचे कोच अंटोनियो लोपेझ यांना चार, तर दोन खेळाडू रॉबर्ट पायरेस आणि फिकरू लेमेसा यांना दोन सामनयंसाठी निलंबित केले आहे. हे दोन्ही खेळाडू व कोच 23 ऑक्टोबर रोजी मडगाव येथे एफसी गोवा संघाविरुद्ध तणावपूर्ण सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध भांडले होते.
दोन्ही संघ हाफटाईममध्ये मैदानावरून परत जात असताना ही बाचाबाची झाली होती. हा सामना कोलकाताने जिंकला. सामन्यानंतर पत्रपरिषदेत गोव्याचे कोच जिको यांनी पायरेसला कोलकाताच्या कोचने ठोसा मारल्याचा आरोप केला होता. (वृत्तसंस्था)
4निलंबनाशिवाय तिघांवरही एआयएफएफच्या शिस्तपालन समितीने पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला.
4कोलकाता संघाचा गोलकीपर कोच प्रदीप कुमार बख्ता यालादेखील पुढील सामन्यासाठी निलंबित करण्यात आले असून, 3क् हजार रुपयांचा दंड अकारण्यात आला आहे.
4याविरुद्ध चार दिवसांच्या आत अपील करता येईल. कोचवर पुढील चार सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली तसेच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.