मुंबई - "Energy of Asia" या ब्रीदवाक्याने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. जवळपास 45 देशांतील हजारो खेळाडू या स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया यांनी वर्षानुवर्षे आशियाई स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. मात्र, त्यांच्या या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या निर्धाराने भारतीय खेळाडू जकार्ता येथे दाखल झाले आहेत.
अनुभव खेळाडू आणि युवा जोश यांची योग्य सांगड यंदाच्या भारतीय चमूत दिसत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंकडून पदकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. भारताने 1951च्या नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत सर्वाधिक 15 सुवर्णपदक जिंकले होते आणि सुवर्णपदकाचा हा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धा आणि भारत याबाबत चला जाणून घेऊया..भारताने आत्तापर्यंत सर्वात मोठं पथक पाठवले आहे. 572 खेळाडू ( 312 पुरूष व 260 महिला) ध्वजधारक - नीरज चोप्रा ( भालाफेकपटू) 45 पैकी 36 क्रीडा प्रकारात भारत सहभाग घेणार आहे.