टोकियो : टोकियो आॅलिम्पिकच्या आयोजनासाठी २०२१ चा शेवटचा पर्याय असून त्याला वारंवार स्थगित करता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमक बाक यांनी म्हटले आहे. बाक म्हणाले, ‘जर पुढील वर्षापर्यंत कोरोना व्हायरस महामारीवर नियंत्रण मिळविता आले नाही तर स्पर्धा रद्द करावी लागेल, याला जपानची सहमती आहे.मार्चमध्ये टोकियो २०२० स्पर्धा २३ जुलै २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आली. बाक म्हणाले, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास जपानची परिस्थिती कळेल. कारण आयोजन समितीमध्ये तुम्ही तीन ते पाच हजार लोकांची सातत्याने नियुक्ती करून ठेवू शकत नाही. तुम्ही प्रत्येकवळी जगातील क्रीडा स्पर्धांचे कॅलेंडर बदलवू शकत नाही. खेळाडूंना साशंकतेच्या भोवऱ्यात ठेवू शकत नाही.’ (वृत्तसंस्था)
‘टोकियो ऑलिम्पिकसाठी २०२१ चा शेवटचा पर्याय’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:40 AM