नवी दिल्ली : भारतीयकुस्ती महासंघासाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्पेनच्या धरतीवर होणाऱ्या आगामी अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या 21 भारतीय पैलवानांचा व्हिसा नाकारण्यात आली आहे. खरं तर शुल्लक कारणावरून व्हिसा नाकारण्यात आला आहे. हे कुस्तीपटू स्पेनमध्ये नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ राहू शकतात, अशी भीती स्पेनच्या दूतावासाने व्यक्त केली आहे. या भीतीमुळे अद्याप व्हिसा मंजूर करण्यात आलेला नाही. एकूण 30 खेळाडूंनी यासाठी अर्ज केले होते, त्यापैकी केवळ 9 खेळाडूंना व्हिसा देण्यात आला आहे.
21 पैलवान व्हिसा मिळण्याच्या प्रतिक्षेतस्पेनमध्ये होणाऱ्या 23 वर्षांखालील जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतातील 21 कुस्तीपटूंना व्हिसा देण्यात आलेला नाही. हे सर्व कुस्तीपटू 23 वर्षांखालील चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार होते. निर्धारित वेळेनंतर देखील हे खेळाडू स्पनेच्या धरतीवर राहू शकतात या भीतीने स्पेनच्या दूतावासाने व्हिसा मंजूर केला नाही. दूतावासाने दिलेल्या या तर्काने भारतीय अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. खरं तर व्हिसा रद्द करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अमित पंघालचाही समावेश आहे. त्यामुळे कुस्ती महासंघ पुढचे पाऊल काय उचलते हे पाहण्याजोगे असेल.
कुस्ती महासंघाने व्यक्त केली नाराजी डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी पीटीआयशी संवाद साधताना याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, याआधी अशा परिस्थितीचा सामना आम्हाला कधीच करावा लागला नव्हता. दूतावासाने दिलेला तर्क आमच्यासाठी धक्कादायक आहे. आमचे खेळाडू आणि प्रशिक्षक जबरदस्तीने स्पेनमध्ये राहतील, असे कोणत्या आधारावर सांगितले जात आहे हे आम्हाला अजिबात समजत नाही. ही एक विचित्र आणि आश्चर्यकारक परिस्थिती आहे. भारत सरकारचे मान्यता पत्र आणि जागतिक कुस्तीची प्रशासकीय समिती संयुक्त जागतिक कुस्तीचे (UWW) निमंत्रण पत्र दाखवूनही व्हिसा न देणे हा धक्कादायक निर्णय आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"