भारोत्तोलन महासंघाद्वारे अस्थायी निलंबननवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वात गेल्या काही वर्षांत घडलेल्या डोपिंग स्कँडलपैकी एक असलेले २१ वेटलिफ्टर्स प्रतिबंधित औषध सेवनात दोषी आढळले आहेत. त्यात यमुनानगर येथे जानेवारीत झालेल्या युवा आणि ज्युनियर स्पर्धेतील खेळाडूंचा समावेश असून, भारोत्तोलन महासंघाने या सर्वांवर अस्थायी निलंबनाची कारवाई केली. भारतीय भारोत्तोलन महासंघाचे महासचिव सहदेव यादव म्हणाले, ‘‘२१ वेटलिफ्टर्स डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांना अस्थायीरीत्या निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या ‘ब’ नमुन्याचे निकाल यायचे आहेत.’’ गेल्या काही वर्षांतील हे सर्वांत मोठ्या स्कँडलपैकी एक असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा, पोलीस क्रीडा स्पर्धा आणि रेल्वेच्या स्पर्धांमध्येही काही जण दोषी आढळून आले. या खेळाडूंचे ‘ब’ नमुनेदेखील पॉझिटिव्ह आल्यास पहिल्यांदा चूक झाली असेल तर ४ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगावी लागेल. राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने (नाडा) पहिल्यांदा दोषी आढळणाऱ्यांची शिक्षा दोनवरून चार वर्षे इतकी केली आहे.पंजाब, हरियाणा, दिल्लीवर २ वर्षांची बंदी?डोपिंगमध्ये जे खेळाडू अडकले त्यात पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या खेळाडूंची संख्या अधिक असल्याने, या राज्य संघांवर पुढील दोन वर्षांसाठी बंदी घालण्याचा महासंघाचा विचार आहे. नियमानुसार वर्षभरात दोनदा डोपिंगमध्ये दोषी आढळणाऱ्या खेळाडूंच्या राज्य संघटनेवरदेखील दोन वर्षांची बंदी घालण्याची तरतूद आहे. त्यामुळे वरील राज्य संघटनांना किमान २ वर्षे कुठल्याही स्पर्धेत खेळता येणार नाही.
२१ वेटलिफ्टर्स डोपिंगमध्ये अडकले
By admin | Published: April 05, 2015 2:04 AM